पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी आज (गुरूवार) दिल्लीतील एम्स रुग्णालयात जाऊन लसीचा दुसरा डोस घेतला. त्यांना आज भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या लसीचा दुसरा डोस देण्यात आला. एम्स रुग्णालयातील परिचारीका निशा शर्मा यांनी त्यांना लस दिली. यावेळी त्यांच्या समवेत परिचारीका पी निवेदा यादेखील उपस्थित होत्या. दरम्यान, पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी लस घेतल्यानंतर नागरिकांनाही लसीकरण पूर्ण करण्याचं आवाहन केलं. "एम्स रुग्णालयात आज कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. कोरोनाला हरवण्यासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी लसीकरण हा एक पर्याय आहे. जर तुम्ही कोरोना लसीसाठी पात्र असाल तर लवकरच लसीकरण पूर्ण करा. http://CoWin.gov.in वर रजिस्टर करा," असं मोदी यावेळी म्हणाले. यापूर्वी त्यांनी १ मार्च रोजी लसीचा पहिला डोस घेतला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला लसीचा दुसरा डोस; म्हणाले, "पात्र असाल तर लवकर..."
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 7:47 AM
Corona Vaccination : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ मार्च रोजी घेतला होता लसीचा पहिला डोस
ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ मार्च रोजी घेतला होता लसीचा पहिला डोससध्या देशात लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे.