शहरं
Join us  
Trending Stories
1
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
3
केवायसी नाही म्हणून खाते फ्रीझ करू नका! आरबीआयने सर्व बँकांना खडसावले
4
Adani Group Stocks: आरोपांनंतर अदानी समूहाचे शेअर्स आजही गडगडले; 'या' कंपनीला सर्वाधिक फटका
5
कोहलीचा 'विराट' संघर्ष कायम! हेजलवूडच्या अतिरिक्त उसळी घेणाऱ्या चेंडूवर 'किंग'ची झाली 'शेळी'
6
सामान्यांना महागाईचा चटका! गॅस कंपनीकडून वाईट बातमी; CNG च्या दरात इतक्या रुपयांची भाववाढ
7
Baba Siddiqui : फोन इंटरनेटचा वापर न करता कसा रचला कट?; बाबा सिद्दिकी हत्येतील आरोपीचं रहस्य उघड
8
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
9
'महागाईविरुद्धची लढाई अजून संपलेली नाही' डिसेंबरमध्ये EMI घटणार? RBI ने दिले संकेत
10
"सीआरपीएफचे जवान नसते तर...", मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी जिरीबाममधील हल्ल्याची दिली माहिती
11
गौतम अदानींना अमेरिकेत अटक होऊ शकते? जाणून घ्या दोषी आढळल्यास काय शिक्षा होईल
12
"आलियाला कपडे बदलायचे होते अन् क्रू मेंबर..." इम्तियाज अलीचा धक्कादायक खुलासा
13
Sensex-Nifty ग्रीन झोनमध्ये, बँक निफ्टी मजबूत; Adani Ent, Adani Port सह मेटल शेअर्स आपटले 
14
वडिलांनी खरेदी केलेल्या पहिल्या बाइकवर बसला भाईजान! बाप-लेकाचा फोटो पाहून चाहते म्हणतात- "स्वॅग असावा तर असा!"
15
Employment: देशात १९ लाख तरुणांना महिनाभरात मिळाले जॉब; ९.३३ टक्के अधिक संधी
16
सांगोल्यात उच्चांकी मतदानामुळे निकालाची उत्कंठा वाढली; महिलांच्या मतदानाचा फायदा कोणाला?
17
दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून खबरदारी, विदर्भातील आमदारांना विशेष विमानाने सुरक्षित ठिकाणी हलवणार
18
माढ्याचा मतदानाचा वाढलेला टक्का कोणाकडे?; गावागावांतील नेतेमंडळी गुंतले आकडेमोडीमध्ये!
19
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
20
मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार 'कर्तव्य पथ'चे उद्घाटन; नेताजींच्या पुतळ्याचेही अनावरण होणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2022 9:30 AM

Kartavya Path : जवळपास 3 किमी लांबीचा राजपथ आता नवीन स्वरूपात 'कर्तव्य पथ' (Kartavya Path) म्हणून ओळखला जाणार आहे.

नवी दिल्ली : आजपासून राजपथचे नाव बदलणार आहे. विजय चौक आणि इंडिया गेटला जोडणारा रस्ता, तो राजपथ आता इतिहासजमा होणार आहे. जवळपास 3 किमी लांबीचा राजपथ आता नवीन स्वरूपात 'कर्तव्य पथ' (Kartavya Path) म्हणून ओळखला जाणार आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदी (PM Narendra Modi)आज संध्याकाळी 7 वाजता 'कर्तव्य पथ' चे उद्‌घाटन करणार आहेत. 

दरम्यान, राजपथाचे केवळ नाव बदलत नाही तर राजपथाचे संपूर्ण रूपच बदलणार आहे. याचबरोबर, यावेळी पंतप्रधाननरेंद्र मोदी इंडिया गेट (India Gate) येथील नेताजी सुभाषचंद्र बोस  (Subhash Chandra Bose) यांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा अरुण योगीराज यांनी तयार केला, जे मुख्य शिल्पकार आहेत. 28 फूट उंच पुतळा एका मोनोलिथिक ग्रॅनाइट दगडात कोरलेला आहे आणि त्याचे वजन 65 मेट्रिक टन आहे.

कसा आहे कर्तव्य पथ?हा कर्तव्य पथ सुमारे तीन किलोमीटरचा आहे. त्यावर 4,087 झाडे आहेत. त्यावर 114 आधुनिक बोर्ड आहेत. 900 हून अधिक दिवे बसवले आहेत. 8 फीचर ब्लॉक्स तयार करण्यात आले आहेत. त्याचे क्षेत्रफळ 1,10,457 चौरस मीटर आहे. काँक्रीटचे 987 जाडीचे खांब आहेत. याशिवाय त्यात 1490 मॅनहोल करण्यात आले आहेत. 4 पादचारी अंडरपास करण्यात आले आहेत. लाल ग्रॅनाइटचे 422 बेंच आहेत.

नाव बदलण्यास मंजुरीकर्तव्यपथावर 6 नवीन वाहनतळ बांधण्यात आले आहेत. 6 वेंडिंग झोन करण्यात आले आहेत. 1580 लाल-पांढऱ्या सँडस्टोनचे बोलार्ड बनवले आहेत. कचरा टाकण्यासाठी 150 डस्टबीन बसवण्यात आले असून या कर्तव्य पथावरील 19 एकर कालव्याचा पुनर्विकास करण्यात आला आहे. NDMC ने बुधवारी राजपथचे नामकरण कर्तव्य पथ असे करण्यास मंजुरी दिली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कर्तव्य पथ राष्ट्राला समर्पित करणार आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNetaji Subhashchandra Boseनेताजी सुभाषचंद्र बोसdelhiदिल्लीprime ministerपंतप्रधान