ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये दहशतवादी हल्ला झाला असला तरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित बेल्जियम दौ-यावर कोणताही परिणाम होणार नाही.
या महिन्याच्या अखेरीस ३० मार्चला नरेंद्र मोदी बेल्जियमला भेट देतील. बेल्जियमच्या पंतप्रधानांबरोबर ते व्दिपक्षीय चर्चा करतील. त्यानंतर ३१ मार्चला वॉशिंग्टनमध्ये होणा-या अण्विक सुरक्षा परिषदेमध्ये सहभागी होतील अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त विकास स्वरुप यांनी दिली.
PM will visit Brussels On March 30 for 13th India-EU Summit: Vikas Swarup, MEA pic.twitter.com/KgcT7NBmBy— ANI (@ANI_news) March 22, 2016