Russia Ukraine War: मोठी बातमी! PM मोदींनी यूपी दौरा अर्धवट सोडला, युक्रेन संकटावरील उच्चस्तरीय बैठकीसाठी दिल्लीला रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 07:28 PM2022-02-27T19:28:59+5:302022-02-27T19:29:54+5:30

Russia Ukraine War: युक्रेन आणि रशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेश दौरा अर्धवट सोडून दिल्लीला रवाना झाले आहेत.

Prime minister narendra modi will hold a high level meeting on the ukraine issue | Russia Ukraine War: मोठी बातमी! PM मोदींनी यूपी दौरा अर्धवट सोडला, युक्रेन संकटावरील उच्चस्तरीय बैठकीसाठी दिल्लीला रवाना

Russia Ukraine War: मोठी बातमी! PM मोदींनी यूपी दौरा अर्धवट सोडला, युक्रेन संकटावरील उच्चस्तरीय बैठकीसाठी दिल्लीला रवाना

Next

Russia Ukraine War: युक्रेन आणि रशियातीलयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेश दौरा अर्धवट सोडून दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत पोहोचताच पंतप्रधान मोदी युक्रेन संकटाच्या मुद्द्यावर उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. गेल्या चार दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. गुरुवारी रशियानं युद्धाची घोषणा केली होती. त्यानंतर दिवसेंदिवस रशियन सैन्य युक्रेनमध्ये आत शिरत जात आहे. रशियानं युक्रेनच्या ४७१ सैनिकांना ताब्यात घेतल्याचीही माहिती समोर आली आहे. युक्रेनच्या एकूण ९७५ सैन्य तळांना उद्ध्वस्त केल्याचा दावा रशियानं केला आहे. तसंच आज रशियाकडून अधिक आक्रमक भूमिका घेतली गेली असून युक्रेनची राजधानी कीव वर रशियानं ताबा मिळवण्यास सुरुवात केली आहे. 

दुसरीकडे युक्रेननं रशियाच्या आतापर्यंत ४,३०० सैनिकांना ठार केल्याचा दावा केला आहे. तसंच १४६ रणगाडे, २७ विमानं आणि २६ हेलिकॉप्टर पाडल्याचंही युक्रेननं म्हटलं आहे. 

खार्किववर रशियाचा कब्जा
युक्रेनच्या खार्किव शहरावर रशियानं कब्जा केला असून आता राजधानी कीवलाही चारही बाजूंनी वेढलं गेलं आहे. रशियन सैन्यानं खार्किववर पूर्णपणे नियंत्रण मिळवल्याची माहिती एएफपी वृत्तसंस्थेनं दिली आहे. खार्किव हे युक्रेनमधील दुसरं सर्वात मोठं शहर मानलं जातं. हे शहर रशियन सीमेपासून २० किमी अंतरावर आहे. रविवारी रशियन सैन्यानं खार्किवमधील विमानतळ, इंधन साठा आणि इतर महत्वाच्या संस्थांवर हल्ले करत शहरावर ताबा मिळवला आहे. 

Web Title: Prime minister narendra modi will hold a high level meeting on the ukraine issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.