बंगळुरु : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र आणि राज्य सरकारवरील ताण वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (दि.16) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.
दरम्यान, या चर्चेपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस येडियुरप्पा यांनी सांगितले की, उद्या आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे लॉकडाऊन आणखी शिथिल करण्याची मागणी करणार आहेत. तसेच, राज्यात लॉकडाऊन वाढविण्याची कोणतीही योजना नाही. वीकेंण्डलाही लॉकडाऊन करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कर्नाटकमधील इतर राज्यांतील बहुतेक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. आम्हाला या लोकांसाठी क्वारंटाइनचे नियम बदलण्याची गरज आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या लोकांना सात दिवसांची संस्थात्मक क्वारंटाइन आणि 7 दिवस होम क्वारंटाइन केले जाईल. दिल्ली आणि तामिळनाडूमधून येणा-या लोकांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाईल, असे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी सांगितले.
दिल्ली आणि तामिळनाडूहून येणाऱ्या लोकांना 3 दिवसांची संस्थात्मक क्वारंटाइन आणि 11 दिवसांचे होम क्वारंटाइन करण्यात येईल. संस्थात्मक क्वारंटाइन म्हणजे सरकारने तयार केलेले क्वारंटाइन सेंटर आहे. तसेच, कर्नाटकात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे, असेही मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा म्हणाले.
कोरोनाच्या पार्श्वभमूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी 16 जून रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत. पंजाब, आसाम, केरळ, उत्तराखंड, कर्नाटक आणि झारखंड अशा अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असून येथील रुग्णांचा रिकव्हरी रेट सुद्धा चांगला आहे. याचबरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जून रोजी ज्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. त्या राज्यांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण खूप जास्त आहे. 17 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, गुजरात आणि राजस्थानसह इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.
दरम्यान, देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर आळा घाल्यासाठी सरकार युद्ध पातळीवर काम करताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 11 हजार 502 नवे रुग्ण आढळले. तर 325 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. चिंताजनक म्हणजे भारतात कोरोना रुग्णांची संख्या 3 लाख 32 हजार 424 वर पोहोचली आहे. आतापर्यंत तब्बल 9 हजार 520 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आणखी बातम्या....
"अज्ञानापेक्षा धोकादायक गोष्ट म्हणजे अहंकार", राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
"हा साधा चावटपणा नाही, हा भलामोठा कट आहे", आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया
मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओत छेडछाड, दिग्विजय सिंह यांच्यासह १२ जणांविरोधात एफआयआर दाखल
CoronaVirus News : अमित शहा 'अॅक्शन मोड'मध्ये, आज बोलविली सर्वपक्षीय बैठक