महाराष्ट्रात मशिदीवरील लाउडस्पीकर काढले गेले नाहीत तर मशिदीसमोर जोरजोरात हनुमान चालीसा वाजविण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेली धमकी आणि त्यावरून राज्यासह देशात चाललेले राजकारण चांगलेच तापले आहे. शनिवारी हनुमान जयंती (Hanuman Jayanti) आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात भगवान हनुमान मूर्तीचे अनावरण करणार असल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उद्या म्हणजेच शनिवारी पंतप्रधान गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हनुमान मूर्तीचे अनावरण करतील. मोरबी येथील बापू केशवानंद यांच्या आश्रमात मूर्ती उभारण्यात आली आहे. दरम्यान, देशभरात भगवान हनुमान चार धाम प्रकल्प उभारला जात आहे. संपूर्ण देशात उभारण्यात येणारी ही दुसरी मूर्ती आहे. 2010 मध्ये शिमल्यात पहिली मूर्ती उभारण्यात आली होती. तसेच, दक्षिणेतील रामेश्वरममध्ये अशाच एका मूर्तीच्या उभारणीचे काम सुरू आहे.
हनुमान जयंतीचे महत्त्वहिंदू पंचांगातील पहिला महिना म्हणजे चैत्र महिना (chaitra month) खूप खास असतो. या महिन्यापासून हिंदूचे नववर्ष सुरू होते. चैत्र नवरात्री असते. गुढीपाडवा असतो. भगवान रामाचा जन्मदिवस रामनवमी(ram navami) असते. तसेच श्रीरामाचे परमभक्त हनुमानाचा जन्मदिवसही या महिन्यात येतो. चैत्र शुक्ल पौर्णिमा हा हनुमानजींचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. हनुमान जयंती हा अंजनीच्या पुत्राचा आशीर्वाद मिळविण्याचा सर्वोत्तम दिवस आहे. या दिवशी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भक्त उपवास ठेवून हनुमानाची पूजा करतात.