पंतप्रधाननरेंद्र मोदींच्या देशवासियांना संबोधून होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमाचा ऐतिहासिक १०० वा भाग आज प्रसारित झाला. यावेळी पंतप्रधाननरेंद्र मोदींनीमन की बातच्या गेल्या ९९ भागातील महत्त्वाच्या टप्प्यांचा उल्लेख केला. तसेच मन की बात हे एक जनआंदोलन बनले आहे, असे उद्गार काढले.
मन की बातमधून देशवासिंयांना संबोधित करताना नरेंद्र मोदी म्ङणाले की, या कार्यक्रमाने मला तुमच्यापासून दूर होऊ दिले नाही. जेव्हा मी मुख्यमंत्री होतो. तेव्हा लोकांशी भेटीगाठी व्हायच्या. मात्र जेव्हा २०१४ मध्ये मी दिल्लीला आहो. तेव्हा येथील जीवन खूप वेगळं असल्याचं माझ्या लक्षात आलं. जबाबदाऱ्या वेगळ्या, सुरक्षेची व्यवस्था, वेळेची मर्यादा, सुरुवातीच्या दिवसांमध्ये खूप वेगळं वाटायचं. ५० वर्षांपूर्वी मी माझं घर यासाठी सोडलं नव्हतं की, एके दिवशी माझ्याच लोकांपासून कठीण होईल. जे देशवासी माझ्यासाठी सर्व काही आहेत. मी त्यांच्यापासून दूर राहून जगू शकत नव्हतो. मन की बात या कार्यक्रमाने मला या आव्हानाचं उत्तर मिळवून दिलं. त्यातून सामान्य जनांपर्यंत पोहोचण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला. पदभार आणि प्रोटोकॉल, व्यवस्थेपर्यंतच मर्यादित राहिला आणि जनभाव, कोट्यवधी लोकांसह माझ्या भावविश्वाचा अतूट भाग बनला.
मोदी पुढे म्हणाले की, आज मन की बात हे एक जनआंदोलन बनले आहे. मग बेटी बचाओ-बेटी पढाओ कार्यक्रम असेल, स्वच्छता आंदोलन असेल, खादी प्रेम असेल किंवा निसर्गाची गोष्ट वा स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव असेल. जे विषय मन की बात कार्यक्रमात आला तो जन आंदोलन बनला.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा य़ांच्यासोबतच्या मन की बात कार्यक्रमाचाही उल्लेख केला. ते म्हणाले, तेव्हा या कार्यक्रमाची चर्चा संपूर्ण जगभरात झाली होती. मन की बात माझ्यासाठी दुसऱ्यांच्या गुणांची पूजा करण्यासारखं आहे. माझ्यासाठी हा कार्यक्रम दुसऱ्यांच्या गुणांपासून शिकण्याचं मोठं माध्यम आहे.