शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बंधू प्रल्हाद मोदी यांना पत्नीशोक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2019 3:47 PM

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या पत्नी भगवती बेन यांचे आज निधन झाले.

अहमदाबाद -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या पत्नी भगवती बेन यांचे आज निधन झाले. त्या 55 वर्षांचा होत्या. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या भगवती बेन या रुग्णालयात उपचार घेत होत्या. दरम्यान, आज हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली. आज संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. भगवती बेन ह्या गेल्या काही दिवसांपासून रक्तदाब, मुत्रपिंड आणि मधुमेहाच्या आजाराने ग्रस्त होत्या. त्यांना अर्धांगवायूचा झटकाही येऊन गेला होता. मृत्यूच्या वेळी त्यांच्यावर अहमदाबाद येथील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बंधू प्रल्हाद मोदी हे अहमदाबाद येथे एक किराणा दुकान चालवतात. बऱ्याच वर्षांपासून त्यांचा नरेंद्र मोदींशी संपर्क आलेला नव्हता. गेल्या 13 वर्षांत मोदींसोबत फारशा भेटीगाठी झाल्या नसल्याचे त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. प्रल्हाद मोदी हे आपल्या रोखठोक भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत. तसेच ते गुजरातमधील रास्त दर धान्य दुकान आणि केरोसिन परवानाधारक असोसिएशनचे प्रमुख आहेत. हल्लीच त्यांनी गुजरात सरकारविरुद्ध आंदोलनही केले होते.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फार पूर्वी कुटुंब सोडले होते. त्यानंतर त्यांचा कुटुंबातील सदस्यांशी फारच कमी संपर्क आलेला आहे. मात्र गुजरात दौऱ्यावर आल्यानंतर ते वेळोवेळी आपल्या आईची भेट घेण्यासाठी जातात.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFamilyपरिवारGujaratगुजरात