पंतप्रधाननरेंद्र मोदी यांचे प्रधान सल्लागार पी.के. सिन्हा यांनी मंगळवारी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात येत आहे. भारतीय प्रशासकीय सेवेच्या १९७७ च्या बॅचचे ते अधिकारी आहेत. सिन्हा यांना सप्टेंबर २०१९ मध्ये पंतप्रधानांच्या प्रधान सल्लागारपदी नियुक्त करण्यात आलं होतं. यापूर्वी त्यांनी पंतप्रधान कार्यालयात ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी म्हणूनही कर्तव्य बजावलं आहे. तसंच त्यांनी चार वर्ष मंत्रिमंडळ सचिव म्हणूनही काम पाहिलं आहे. याव्यतरिक्त सिन्हा हे ऊर्जा मंत्रालयात सचिवपदीही कार्यरत होते. सिन्हा यांनी १३ जून २०१५ ते ३० ऑगस्ट २०१९ या कालावधीत मंत्रिमंडळ सचिव म्हणून काम पाहिलं आहे. सिन्हा हे उत्तर प्रदेश कॅडरच्या १९७७ च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत. त्यांनी आतापर्यंत सरकारच्या निरनिराळ्या खात्यांमध्ये मोलाची भूमिका बजावली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रधान सल्लागार पी.के.सिन्हा यांचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 5:38 PM
यापूर्वी सिन्हा यांनी मंत्रिमंडळ सचिव म्हणूनही सांभाळली होती जबाबदारी
ठळक मुद्देयापूर्वी सिन्हा यांनी मंत्रिमंडळ सचिव म्हणूनही सांभाळली होती जबाबदारीत्यांनी अनेक मोठ्या पदांवरही बजावलं आहे कर्तव्य