नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे ३१ मार्च २०१६ अखेरपर्यंत एकूण एक कोटी ७३ लाख रुपयांची स्थावर-जंगम मालमत्ता होती आणि त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत त्यांच्या मालमत्तांचे मूल्य १३ लाख २० हजार रुपयांनी वाढले आहे, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाच्या (पीएमओ) वेबसाईटवर देण्यात आली आहे.प्रत्येक मंत्र्याने प्रत्येक वित्तीय वर्षाच्या अखेरीस आपल्या, पत्नी वा पतीच्या आणि अवलंबून असलेल्या अन्य कुटुंबियांच्या नावे असलेल्या मालमत्तांचा तपशील प्रसिद्धीसाठी ‘पीएमओ’कडे द्यावा, असे ठरले आहे. त्यानुसार पंतप्रधान मोदी यांनी वर्ष २०१५-१६ या वित्तीय वर्षासाठीचा आपल्या स्थावर-जंगम मालमत्तांचा तपशील जाहीर केला आहे.पारदर्शी कारभाराचा एक भाग म्हणून मोदींनी ही प्रथा सुरु केली खरी, पण त्यांच्या मंत्रिमंडळातील बहुतांश मंत्र्यांनी आपापल्या मालमत्तांचा ताजा तपशील अद्याप जाहीर केलेला नाही. ज्यांनी मालमत्ता जाहीर केल्या आहेत त्यांत अरुण जेटली, सुषमा स्वराज, एम.व्यंकय्या नायडू, सदानंद गौडा, रामविलास पासवान, मेनका गांधी व प्रकाश जावडेकर यांचा समावेश आहे. इतर मंत्र्यांच्या तुलनेत मोदी खूपच ‘गरीब’ आहेत, असे या आकडेवारीवरून दिसते.आधीच्या वर्षाच्या तुलनेत मोदींच्या स्थावर मालमत्तेच्या मूल्यात अजिबात वाढ झालेली नाही. जंगम मालमत्तांच्या मूल्यात जी एकूण १३.२० लाख रुपयांची वाढ झाली आहे, त्यात मोदींनी लिहिलेल्या किंवा त्याच्याविषयी लिहिलेल्या पुस्तकांच्या ‘रॉयल्टी’पोटी मिळणार असलेले १२ लाख ३५ हजार ७९० रुपये व हातात असलेल्या रोकड रकमेत झालेल्या ८५ हजार २०० रुपयांच्या वाढीचा समावेश आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)पंतप्रधान मोदी यांनी मालमत्तांच्या या जाहिरनाम्यात जशोदाबेन यांचा पत्नी म्हणून नामोल्लेख केला आहे. मात्र जशोदाबेन यांच्या नावे किती व कोणत्या स्थावर वा जंगम मालमत्ता आहेत याची आपल्याला माहिती नसल्याचे म्हटले आहे. ‘अवलंबून असलेले अन्य कुटुंबीय’ या रकान्यात त्यांनी ‘लागू होत नाही’, असे नमूद केले आहे.>स्थावर मालमत्ता01कोटी रुपये(गांधीनगर येथील निवासी इमारतीमधील ६७९ चौरस फुटांचा १/४ हिस्सा)(याखेरीज अन्य कोणतीही शेतजमीन, निवासी भूखंड अथवा व्यापारी इमारत नाही.)
पंतप्रधान नरेंद्र मोदींची मालमत्ता पावणे दोन कोटीच!
By admin | Published: August 27, 2016 6:03 AM