शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प सरकार! कमला हॅरिस यांना पराभूत करत मिळवला दणदणीत विजय
2
Maharashtra Election 2024: राज ठाकरेंचा 'या' मतदारसंघातील उमेदवाराबद्दल मोठा निर्णय
3
"...तर पाय कलम करू", नितेश राणेंना मारण्याची धमकी देणाऱ्या सिद्दिकींना नारायण राणेंचे उत्तर
4
AUS vs IND : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी यजमानांची 'भारी' तयारी; क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय
5
Salman Khan : हस्ताक्षरामुळे उघड होणार सलमान खानच्या घरावरील गोळीबार आणि पत्राचं रहस्य
6
Raha Kapoor Birthday: दोन वर्षांची झाली राहा कपूर, आजी नीतू अन् आत्या रिद्धीमाने शेअर केला क्युट फोटो
7
भारत ऑस्ट्रेलियाशी टेस्ट मालिका हरला तरीही WTC Final गाठू शकतो, जाणून घ्या गणित
8
मुस्लिमांसाठी १० हजार कोटींचं बजेट; मविआच्या जाहीरनाम्यात समाजवादी पक्षाची मागणी
9
लाडक्या बहिणींना वर्षाला देणार २५००० ; अजित पवारांची घोषणा, जाहीरनाम्यात काय काय?
10
‘गुरुचरित्र’सारखा प्रभाव, दत्तात्रेयांच्या आद्य अवताराचे सार; मनोभावे स्मरण, लाभेल पुण्य!
11
"सत्ता गेली, तर कुत्र पण विचारणार नाही", मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांनी फटकारलं
12
कोण आहे अमन देवगण? 'आजाद'मधून करतोय पदार्पण, अजय देवगणसोबत आहे हे कनेक्शन
13
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या ग्रामीण भागात 'सुपरहिट'; कमला हॅरिस यांचे प्रयत्न कमी पडल्याची चिन्हे
14
'अनुपमा' फेम रुपाली गांगुलीवर सावत्र मुलीचे नवे आरोप; म्हणाली, "ती माझ्या आईच्या बेडवर..."
15
सीमेवर नवी ताकद... आता भारतीय लष्कराला मेड इन इंडिया ASMI शस्त्र मिळणार!
16
Swiggy IPO गुंतवणूकीसाठी खुला, अँकर गुंतवणूकदारांकडून उभे केले ५००० कोटी; GMP काय?
17
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; तुमच्याकडे कारचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर...
18
रुपाली भोसलेने Bigg Boss मधील 'या' स्पर्धकाची केली कानउघाडणी; म्हणाली, "का हा ॲटिट्युड?"
19
कंगना रणौतचा डोनाल्ड ट्रम्प यांना सपोर्ट, म्हणाली- "मी अमेरिकन असती तर..."
20
Sunita Williams : सुनीता विलियम्स यांच्यासह नासाच्या ३ अंतराळवीरांनी केलं मतदान; स्पेसमधून कसं दिलं जातं मत?

India-pakistan relation: पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानं पाकिस्तानला फुटला घाम, भीत-भीत दिलं नोटिशीला उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2023 1:38 AM

जानेवारी 2023 मध्ये पाकिस्तानला ही नोटीस देण्यात आली होती. या नोटिशीला त्यांनी आता उत्तर दिले आहे.

पाकिस्तानची ढेपाळलेली आर्थिक स्थिती कुणापासूनही लपून राहिलेली नाही. पाकिस्तानवर हातात कटोरा घेऊन जगभर भीक मागण्याची वेळ आली आहे. यातच मोदी सरकारनेही पाकिस्तानवर अॅक्शन घेतली आहे. यावर 4 महिन्यांनंतर पाकिस्तानकडून त्याचे उत्तर आले आहे. भारत सरकारने सिंधू जल करारासंदर्भात पाकिस्तानला नोटीस जारी केली आहे. जानेवारी 2023 मध्ये पाकिस्तानला ही नोटीस देण्यात आली होती. या नोटिशीला त्यांनी आता उत्तर दिले आहे.

सिंधू जल कराराचे उल्लंघन केल्याबद्दल पाकिस्तानला नोटीस -पाकिस्तानने सिंधू जल कराराच्या कलम IX चे उल्लंघन केल्याबद्दल भारताने जानेवारी महिन्यात ही नोटीस बजावली होती. पाक परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांनी आठवड्याच्या ब्रीफिंगमध्ये यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, पाकिस्तान सिंधू जल करारासाठी वचनबद्ध आहे. नोटीस मिळाल्यानंतर 3 महिन्यांच्या आत पाकिस्तानला आक्षेप नोंदवायचा होता. मात्र आता 4 महिन्यांनंतर पाकिस्तानने उत्तर दिले आहे. पाकिस्तानच्या आयुक्तांनी आपल्या समकक्षांना या नोटिशीचे उत्तर दिले आहे.

काय आहे सिंधू जल करार ?भारत आणि पाकिस्तान दरम्यान सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्याचे वाटप कशा पद्धतीने नियंत्रित केले जावे, हे सिंधू जल करार निर्धारित करतो. या जल करारावर भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे मिलिटरी जनरल अयुब खान यांनी 1960 साली स्वाक्षरी केली होती. जागतिक बँकेचाही या करारात सहभाग आहे.

...म्हणून पाकिस्तानला बजावण्यात आली नोटीस - सिंधू खोऱ्याच्या पूर्वेकडील नद्यांवर भारताचा अधिकार आहे. याच बरोबर, भरताला पश्चिमेकडील नद्यांवर जलविद्युत निर्मितीसाठी काही विशेष नियमांसह अधिकार देण्यात आले आहेत. यावर आक्षेप घेत पाकिस्तानने तटस्थ तज्ज्ञाची मागणी केली होती. यानंतर पाकिस्तानने अचानकच मध्यस्थ कोर्टाची मागणी करायला सुरुवात केली. याच एकतर्फी कारवाईमुळे कराराच्या आर्टिकल IX चे उल्लंघन झाले आहे. यामुळेच त्याला नोटीस देण्यात आली आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतWaterपाणी