शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
2
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
3
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
4
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
5
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
6
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
7
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
8
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
9
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
10
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
11
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
12
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
13
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
14
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
15
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
16
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
17
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
18
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
19
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
20
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 

पंतप्रधान लवकरच पाच देशांच्या दौऱ्यावर

By admin | Published: May 30, 2016 3:14 AM

४ जूनपासून ते अफगाणिस्तान, कतार, स्वीत्झर्लंड, अमेरिका आणि मेक्सिको या पाच देशांची वारी करणार आहेत.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये २६ देशांना भेटी दिल्या असून, अलीकडेच त्यांनी एक छोटेखानी विदेश दौरा आटोपला असताना ४ जूनपासून ते अफगाणिस्तान, कतार, स्वीत्झर्लंड, अमेरिका आणि मेक्सिको या पाच देशांची वारी करणार आहेत. अध्यक्ष बराक ओबामा यांच्या निमंत्रणावरून ते अमेरिकेला भेट देणार आहेत.१,४०० कोटी रुपये खर्चून अफगाणिस्तानात बांधण्यात आलेल्या सलमा धरणासाठी भारताने निधी दिला असून, मोदी या भेटीत या धरणाचे उद्घाटन करतील. त्यानंतर ते ऊर्जासंपन्न कतार आणि स्वीत्झर्लंडला भेट देतील. कतारमधील दोन दिवसांच्या वास्तव्यात ते कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल-थानी यांच्याशी आर्थिक आघाडीवरील करारांसह विविध द्विपक्षीय मुद्द्यांवर व्यापक चर्चा करतील. विशेषत: हायड्रोकार्बन क्षेत्रातील करारांवर त्यांचा भर असेल.२०१४च्या लोकसभा निवडणुकीत मोदींनी काळा पैसा विदेशातून आणण्याचे आश्वासन दिले होते. स्वीस बँकेत भारतीयांना ठेवलेला काळा पैसा हुडकून काढण्यात सहकार्य देण्याबाबत ते स्वीत्झर्लंडचे अध्यक्ष जोहान स्नीदर अम्मान यांच्याशी चर्चा करतील. करासंबंधी मुद्द्यांबाबत आपसूक माहितीचे आदानप्रदान करता यावे, यासाठी मार्ग प्रशस्त करण्याबाबत दोन देशांच्या अधिकाऱ्यांनी कराराला अंतिम स्वरूप देण्याचा प्रयत्न चालविला आहे. भारत आणि अन्य देशांना कराबाबत आपसूक माहिती देणारी यंत्रणा आणण्यासंबंधी वटहुकुमाबाबत स्वीस सरकारने १८ मेपासून सल्लामसलतीची प्रक्रिया अवलंबली आहे.>अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त बैठकीत भाषण...अलीकडेच ओबामा यांनी दिलेल्या निमंत्रणावरून मोदी ७ जून रोजी अमेरिकेला भेट देणार आहेत. ओबामांसोबतच्या बैठकीत संरक्षण, सुरक्षा आणि ऊर्जा या क्षेत्रातील करारासंबंधी प्रगतीचा आढावा घेतला जाईल. मोदींनी यापूर्वी तीन वेळा अमेरिकेला भेट दिली आहे.>ते अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त सभेला संबोधित करतील. परतीच्या प्रवासात ते मेक्सिकोला भेट देणार असून व्यापार आणि गुंतवणुकीवर त्यांचा डोळा असेल. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्र महासभेच्यावेळी त्यांनी मेक्सिकोचे अध्यक्ष एन्रीक पेना निएटो यांच्याशी चर्चा केली होती. मोदींनी २०१५ मध्ये २६ देशांना भेटी देत ते विदेश दौऱ्यांचे वर्ष राहिल्याचे दाखवून दिले.