गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या निरनिराळ्या सीमांवर नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. दरम्यान, प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीलाही हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं होतं. त्या घटनेनंतर सरकारही आंदोलकांचा कठोरपणे सामना करण्याची तयारी करण्याच्या तयारीत दिसत आहे. दिल्लीच्या सीमांवर आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांद्वारे अनेक पावलं उचलण्यात येत आहेत. यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिल्लीच्या सीमांवर पोलिसांद्वारे करण्यात येत असलेल्या तयारीची काही छायाचित्र आपल्या ट्विटर अकाऊंटवरू शेअर केली आहे. "भारत सरकार, भिंती उभारू नका, पूल उभारा," असं कॅप्शनही त्यांनी या फोटोंना दिलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनीदेखील एक व्हिडीओ शेअर करत सरकारवर निशाणा साधला आहे. तसंच पंतप्रधान महोदय, आपल्याच शेतकऱ्यांशी युद्ध? असं कॅप्शनही त्यांनी त्याला दिलं आहे.
पंतप्रधान, आपल्याच शेतकऱ्यांशी युद्ध?; दिल्लीच्या सीमांवरील प्रवेशबंदी पाहून राहुल-प्रियंका गांधींचा सवाल
By जयदीप दाभोळकर | Published: February 02, 2021 12:36 PM
सीमांवर पोलिसांकडून बॅरिकेडिंग, रस्त्यांवर खिळेही ठोकले
ठळक मुद्देसीमांवर पोलिसांकडून बॅरिकेडिंग, रस्त्यांवर खिळेही ठोकले६ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या चक्का जामचा इशारा