नवी दिल्ली : गुंतवणूक आकर्षित करण्यासोबतच तंत्रज्ञान मिळविण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारपासून फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडा या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. या नऊ दिवसांच्या दौऱ्यात नागरी अणुऊर्जा, संरक्षण अशा अनेक महत्त्वपूर्ण मुद्यांवर चर्चा अपेक्षित आहे.मोदींचा पहिला मुक्काम फ्रान्समध्ये असून येथील चार दिवसांच्या मुक्कामात ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलोंद यांच्यासोबत चर्चा करतील. ओलोंद यांच्या सोबत नौकाविहाराचा आनंदही ते घेतील. याला ‘नाव पे चर्चा’ असे नाव दिले आहे. येथील पहिल्या महायुद्धाच्या स्मारकाला ते भेट देतील. (लोकमत न्यूज नेटवर्क)
पंतप्रधानांचा नऊ दिवसांचा परदेश दौरा
By admin | Published: April 10, 2015 4:08 AM