चंदीगड - शाळकरी मुलीला परीक्षेत मदत करण्याच्या बहाण्यानं मुख्याध्यापकाने तिचा बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सोनीपत येथील हा धक्कादायक प्रकार आहे. पीडित ही दहावी इयत्तेतील विद्यार्थिनी आहे. परीक्षेला डमी परीक्षार्थी पाठवत मुख्याध्यापकाने पीडित मुलीला शाळेलगतच्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी मुख्याध्यापक आणि अन्य दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करत पास्को कायद्या अंतर्गत मुख्याध्यापक आणि दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांनी सांगितले की, माझ्या मुलीनं दहावीच्या परीक्षेत पास व्हावे, यासाठी तिच्या वडिलांनी मुख्याध्यापकाशी संपर्क साधला. त्यावेळी मुख्याध्यापकांनी यासाठी 10 हजार रुपये देण्याची मागणी केली. या सहमती दर्शवल्यानंतर मुख्याध्यापकाने 8 मार्चला पीडित मुलीच्या वडिलांना फोन केला.
यावेळी आरोपी मुख्याध्यापकानं पीडितेच्या वडिलांना सांगितले की, 'तुमच्या मुलीला घेऊन शाळेत या. परीक्षेत तिच्याऐवजी डमी परीक्षार्थी पाठवण्यात येईल. पेपर संपेपर्यंत मुलगी शाळेलगत माझ्या नातेवाईकाच्या घरी थांबेल. परीक्षा संपल्यावर तुम्ही तिला घेऊन जा'.ही संधी साधून मुख्याध्यापकानं विद्यार्थिनीवर बलात्कार केला. या कामात मुख्याध्यापकाला दोन महिलांनी मदत केल्याचे त्यांनी पीडित मुलीच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे. सध्या तिन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. परिसरातील सीसीटीव्हींचीही मदत घेण्यात येत आहे.