नवी दिल्ली : साठेबाजीला ऊत येऊ नये आणि अर्थव्यवस्थेत काळ्या पैशाचा शिरकाव होऊ नये, या कारणांसाठी गेल्या दोन वर्षांपासून दोन हजार रुपये मूल्याच्या नोटांची छपाई बंद करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारतर्फे सोमवारी लोकसभेत देण्यात आली. (Printing of 2,000 notes has been stopped for the last two years, Union Finance Minister informed in the Lok Sabha)
‘भारतीय रिझर्व्ह बँकेशी सल्लामसलत करून मगच दोन हजार रुपये मूल्याच्या नोटेची छपाई थांबविण्यात आली आहे. २०१९-२० आणि २०२०-२१ या आर्थिक वर्षांत दोन हजार रुपयांच्या चलनाची छपाई न करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० आणि १००० रुपये मूल्याच्या नोटा चलनातून बाद ठरविल्यानंतर २००० रुपये मूल्याची नोट बाजारात आणली होती.
कधी, किती छापल्या दोन हजारच्या नोटा? ३३५ कोटी २०१६-१७११ कोटी २०१७-१८४.६ कोटी २०१८-१९ एप्रिल, २०१९ पासून एकही नवी नोट छापलेली नाही
चलनात असलेल्या दाेन हजार रुपयांच्या नोटा- ३० मार्च २०१८ ३३६ - कोटी - २६ फेब्रुवारी २०२१२५० कोटी