पटना : बिहारमधील सरकारी रुग्णालयातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारच्या सरकारी रुग्णालयात कैदी उपचार घेत असलेल्या वार्डमध्ये कॉलगर्ल सापडल्याची घटना समोर आली आहे.या घटनेमुळे बिहारमध्ये गोंधळ उडाला आहे. काही महिन्यांपूर्वी अशीच एक घटना समोर आली होती. एक कैदी उपचार घेत असताना आपल्या पत्नीचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी बाहेर गेल्याचे समोर आले होते.
बिहारमधील कैद्यांची रुग्णालयाच मौजमजा सुरू असल्याचे समोर आले आहे. ही घटना बिहारमधील हाजीपूर येथील सरकारी रुग्णालयातील आहे. या रुग्णालयात कैदी आजारी पडल्याचे सांगून रुग्णालयात मौजमजा करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
दरम्यान, काही दिवसापूर्वी अशीच एक घटना समोर आली आहे. दुसऱ्या जिल्ह्यातील एक कॉल गर्ल या रुग्णालयात कैद्यासोबत सापडली. हे प्रकरण समोर आल्यानंतर रुग्णालयाची आणि तुरुंग प्रशासनाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
एका चोरीच्या मोबाईलमुळे हे प्रकरण उघडकीस आले आहे. चोरीच्या मोबाईलची चौकशी करण्यासाठी पोलीस रुग्णालयात आले होते, यावेळी त्यांना कैद्याच्या वार्डमध्ये कॉलगर्ल असल्याचे दिसले. या संदर्भात त्यांनी चौकशी केली, यानंतर हा प्रकार समोर आला.
Patna Crime: पाटण्यात एका तरुणाला तीन मुलींसोबत पकडले; रूमची अवस्था पाहून पोलिसांनाही बसला धक्का
यावरुन आता बिहार सरकारवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मंत्री तेजस्वी यादव यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. बिहारमध्ये नुकतेच काही महिन्यापूर्वी सत्तांतर झाले आहे. मुख्यमंत्री यांनी भाजपसोबत युती तोडून लालू प्रकाश यादव यांच्या आरजेडीसोबत जात सरकार स्थापन केले आहे. तर दुसरीकडे मंत्री तेजस्वी प्रकाश यांनी सरकारी रुग्णालयात सुधारणा करणार असल्याचे वक्तव्य केले होते.