शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

Prisoner Cracked IIT: खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या कैद्याने उत्तीर्ण केली IIT परीक्षा, संपूर्ण भारतात 54वा क्रमांक मिळवला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 2:50 PM

Prisoner Cracked IIT Exam: बिहारच्या एका तुरुंगात खुनाची शिक्षा भोगत असलेल्या एका तरुण कैद्याने दोनवेळा IIT एंट्रंस परीक्षा पास केली. गेल्यावर्षी त्याने संपूर्ण देशात 34वा आणि यंदा 54वा रँक मिळवला.

नवाडा(बिहार): असं म्हणतात की मनात काहीतरी करण्याची इच्छा असेल, तर प्रत्येक अडचणीवर सहज मात करता येते. कारागृहातील एका तरुण कैद्याने अशक्य अशी गोष्ट शक्य करुन दाखवली आहे. खुनाच्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या सूरज कुमार उर्फ ​​कौशलेंद्रने आयआयटीची मास्टर्स (जेएएम) संयुक्त प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आहे. आयआयटी रुरकीने(IIT Rurkee) घेतलेची परीक्षा त्याने फक्त पासच केली नाही, तर परीक्षेत संपूर्ण भारतातून 54वा क्रमांक पटकावला.

सूरज हा वारिसालीगंज पोलीस स्टेशन हद्दीतील मोस्मा गावचा रहिवासी असून एका खुनाच्या गुन्ह्यात तो जवळपास एका वर्षापासून तुरुंगात आहे. नवाडातील कारागृहात असताना त्यांने या खडतर परीक्षेची तयारी केली. तुरुंग प्रशासनाने त्याला परीक्षेच्या तयारीसाठी खूप मदत केली. तुरुंगात असताना कठोर परिश्रम आणि स्वतःला अभ्यासात झोकून देऊन ही अवघड अशी परीक्षा उतीर्ण मोठे यश मिळवले.

एप्रिल 2021 पासून तुरुंगातखुनाच्या आरोपाखाली सूरज एप्रिल 2021 पासून तुरुंगात आहे. नवादा जिल्ह्यातील वारिसलीगंज ब्लॉकमधील मोस्मा गावात दोन कुटुंबांमध्ये रस्त्याच्या वादावरुन जोरदार भांडण झाले होते. एप्रिल 2021 रोजी झालेल्या हल्ल्यात संजय यादव गंभीर जखमी झाले आणि पाटणा येथे उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मृताचे वडील बासो यादव यांनी सूरज, त्याचे वडील अर्जुन यादव यांच्यासह नऊ जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला. 19 एप्रिल 21 रोजी पोलिसांनी सूरजसह चार जणांना अटक करून तुरुंगात पाठवले, तेव्हापासून सूरज तुरुंगात आहे.

गतवर्षीही यश मिळाले पण तुरुंगात गेल्याने प्रवेश घेता आला नाहीविशेष म्हणजे सूरजने गेल्या वर्षीही ही परीक्षा उत्तीर्ण केली होती आणि संपूर्ण भारतात 34वा क्रमांक मिळवला होता, मात्र अखेरच्या क्षणी तो या खुनाच्या कचाट्यात अडकला. तुरुंगात गेल्यावरही सूरजचा उत्साह कमी झाला नाही आणि आज पुन्हा तुरुंगात असतानाच त्याने हा पराक्रम केला आहे. जाहीर झालेल्या निकालात सूरजला संपूर्ण भारतात 54वा क्रमांक मिळाला आहे. यासह, तो आता आयआयटी रुरकीमध्ये प्रवेश घेऊन पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करू शकणार आहे. सूरजच्या या यशाबद्दल सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत. 

टॅग्स :examपरीक्षाBiharबिहारStudentविद्यार्थी