पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे निरीक्षक; भारत जोडो यात्रेनंतरच्या योजनेची अंमलबजावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 07:44 AM2022-12-28T07:44:09+5:302022-12-28T07:44:54+5:30
राहुल गांधी यांच्या कार्यशैलीवर नेहमीच टीकास्त्र सोडणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर कर्नाटक राज्याची जबाबदारी सोपविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली :काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेली भारत जोडो यात्रा आता अखेरच्या टप्प्यात असून या यात्रेनंतरच्या योजनेचे नियोजन व त्याची अंमलबजावणी करण्याची कवायत काँग्रेस नेतृत्वाने सुरू केली आहे. ‘हाथ से हाथ जोडो अभियान’ असे या अभियानाचे नाव असून यासाठी प्रत्येक राज्यासाठी एका नेत्याची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. राहुल गांधी यांच्या कार्यशैलीवर नेहमीच टीकास्त्र सोडणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर कर्नाटक राज्याची जबाबदारी सोपविली आहे.
महाराष्ट्रासाठी माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू व माजी खासदार पी. एल. पुनिया यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. पल्लम राजू यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश व पुनिया यांच्यावर मुंबई प्रदेश काँग्रेस समितीची जबाबदारी राहणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"