नवी दिल्ली - भारतीय अंतराळा संशोधन संस्था (इस्रो) चे प्रमुख के, सिवन यांनी अंतराळ मोहिमांच्या कामाबाबत एक मोठी घोषणा केली आहे. आता खासगी क्षेत्रातील कंपन्यांनाही रॉकेट, उपग्रहनिर्मिती आणि प्रक्षेपण सेवेसारख्या अंतराळ मोहिमांच्या क्षेत्रात काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच आता खासगी क्षेत्रातील कंपन्याही इस्रोच्या आंतरग्रहीय मोहिमांमध्ये भागीदारी करू शकतील, अशी माहिती इस्रोप्रमुखांनी दिली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी झालेल्या बैठकीत नव्या ग्रहांचा शोध घेण्याच्या मोहिमेसह आंतराळातील विविध मोहिमांमध्ये खासगी क्षेत्राच्या भागीदारीस परवानगी दिली होती. त्यानंतर इस्रोप्रमुखांनी ही घोषणा केली आहे. मात्र असे असले तरी इस्रो आपल्या कुठल्याही कार्यक्रमांमध्ये कपात करणार नाही. तसेच अंतराळ आधारित कार्यक्रमांमध्ये अधिक प्रगत संशोधन आणि विकास करण्यासोबतच आंतरग्रहीय आणि मानवी अंतराळ मोहीमांचे काम इस्रोकडून सुरूच राहील, असे इस्रोप्रमुख के. सिवन यांनी स्पष्ट केले आहे.
हल्लीच स्थापन करण्यात आलेल्या IN-SPACe या संस्थेकडे अंतराळ क्षेत्रात खासगी कंपन्यांसाठी एक समान व्यवस्था तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे या कंपन्यांना भारतीय अंतराळ क्षेत्रातील मुलभूत संरचनेचा उपयोग करू शकतील. ही संस्ता खासगी क्षेत्राला अंतराळ क्षेत्रात प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करण्याचे कामही करेल त्यासाठी निश्चित धोरण ठरवून अनुकूल वातावरण तयार केले जाईल.
इतर महत्त्वाच्या बातम्या
योगगुरू ते उद्योगगुरू! एकेकाळी सायकलवरून विकायचे च्यवनप्राश, आता करतात अब्जावधीची उलाढाल
coronavirus: वृद्ध आणि आजारी व्यक्तींनंतर आता कोरोना करतोय तरुणांना टार्गेट, तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
coronavirus: कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना भविष्यात करावा लागू शकतो या समस्यांचा सामना
गलवानमध्ये किती सैनिक मारले गेले, सरकारच्या मौनामुळे चिनी नागरिक संतापले
मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर
कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले
भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण....
ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली