नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेत हजारो कोटी रुपयांचा घोटाळा करून फरार झालेला आरोपी मेहुल चोक्सी याला डोमिनिका येथून भारतात आणण्यासाठी तिथे गेलेले भारतीय अधिकाऱ्यांचे पथक रिकाम्या हाताने परतले आहे. मेहुल याला जामीन देण्यास डोमिनिका न्यायालयाने नकार दिला आहे.आता त्याच्या हेबिअस कॉर्पस अर्जाची पुढील सुनावणी जुलैमध्ये होणार आहे. त्यामुळे मेहुल चोकसीला सध्या तरी भारतात आणणे अशक्य बनले आहे. त्याला भारतात आणण्याच्या मोहिमेवर अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी व सीबीआयच्या बँक सिक्युरिटीज व आर्थिक घोटाळे विभागाचे मुंबईचे प्रमुख हे कतार एअरवेजच्या विमानाने डोमिनिका येथे पोहोचले होते. डोमिनिकामध्ये अवैधरीत्या प्रवेश केल्याच्या आरोपावरून मेहुलला अटक करण्यात आली आहे. तो जखमी असल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.अँटिग्वाची तयारीमेहुल चोकसी हा अँटिग्वातून डोमिनिकामार्गे क्युबाला पळून जाण्याच्या तयारीत होता, असा दावा करण्यात येत आहे. नेमके त्याच वेळेस त्याला डोमिनिकाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. डोमिनिकाने त्याला भारताच्या हवाली करावे, अशी भूमिका अँटिग्वाने घेतलीआहे.अँटिग्वाचे पंतप्रधान गॅस्टन ब्रॉवने यांनी सांगितले की, चोकसीवर भारतामध्ये फौजदारी खटले सुरू आहेत. त्याला डोमिनिकातून पुन्हा अँटिग्वाला पाठवू नये, असे आम्ही त्या देशाच्या सरकारला कळविले.
चोक्सीला आणण्यास गेलेले अधिकारी रिकाम्या हाती परत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2021 6:21 AM