- संतोष ठाकूर नवी दिल्ली : रेल्वे विभाग आगामी काळात प्लेटफॉर्म तिकीट विक्री बंद करणार असून, हे काम खासगी कंपन्यांना देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरु, हैदराबाद, चेन्नईसह देशातील एक डझनपेक्षा अधिक रेल्वे स्टेशनवर याची सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानंतर देशातील सर्व बी आणि सी श्रेणीच्या स्टेशनवर याची अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव आहे.एका अधिकाºयाने सांगितले की, सद्याच्या स्त्रोतातून अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी जी तयारी सुरु आहे त्यात हा मुद्दाही आहे. खासगी कंपन्या आपल्या मशिन लावून प्लेटफॉर्म तिकीट विक्री करु शकतात. त्याआधारे त्यांना कमिशन वा दीर्घकालीन पेमेंट सिस्टिमव्दारे लाभ दिला जाऊ शकतो. प्लेटफॉर्म तिकिटासाठी खासगी कंपन्यांशी करार करण्याचे कामही नव्या ‘रेल लँड डेव्हलपमेंट अॅथोरिटी’ला सोपविले जाऊ शकते. खासगी कंपन्या टच स्क्रिनची आणि अनेक सुविधा देणारी मशिन बसवू शकतात. या मशिनच्या माध्यमातून केवळ प्लेटफॉर्म तिकीटच नव्हे, तर विविध रेल्वेची माहितीही प्राप्त केली जाऊ शकते.
प्लॅटफॉर्म तिकिटांचे खासगीकरण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 3:56 AM