शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

जाहिरातींवर निर्बंध घालण्यासाठी सुप्रीम कोर्टाने वापरला विशेषाधिकार

By admin | Published: May 13, 2015 10:27 PM

सरकारी जाहिरातींच्या सत्ताधाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या गैरवापरास कसा आळा घालता येईल यावर विचार करण्यासाठी न्यायालयाने यापूर्वी एक त्रिसदस्यीय

नवी दिल्ली : सरकारी जाहिरातींच्या सत्ताधाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या गैरवापरास कसा आळा घालता येईल यावर विचार करण्यासाठी न्यायालयाने यापूर्वी एक त्रिसदस्यीय समिती नेमली होती. त्या समितीच्या शिफारशी खंडपीठाने स्वीकारल्या व त्यांचे न्यायालयीन आदेश म्हणून पालन केले जावे, असे निर्देश दिले. या विषयी सध्या कोणताही कायदा नाही. त्यामुळे राज्यघटनेच्या अनुच्छेद १४१ अन्वये असलेल्या विशेषाधिकारात आपण हा आदेश देत आहोत व संसदेने कायदा करीपर्यंत तो लागू राहील, असे न्यायालयाने स्पष्ट केले.जाहिरातींमध्ये मंत्री व राजकीय नेत्यांच्या फोटोंना बंदी घालण्याची कारणमीमांसा करताना खंडपीठाने ३३ पानी निकालपत्रात म्हटले: कोणत्या ना कोणत्या सोहळ््याच्या वा प्रसंगाच्या निमित्ताने माध्यमांमध्ये दररोज सरकारी जाहिराती प्रसिद्ध होत असतात. अशा जाहिरातींमध्ये सरकारी मंत्री अथवा राजकीय नेत्याचे छायाचित्र छापल्याने त्या जाहिरातीमधील मजकूरविषय ही त्या व्यक्तीची कामगिरी आहे, असे स्वाभाविकपणे सूचित होते. किंवा जाहिरातीत उल्लेख केलेल्या सरकारी योजना अथवा कार्यक्रम ही त्या व्यक्तीची देन आहे, असा संदेश जनतेत जातो. परिणामी अशा प्रकारे छायाचित्र प्रसिद्ध करण्याने त्या संबंधित व्यक्तीचे स्तोम माजविले जाते. अशा प्रकारे ज्यांच्या हाती सत्ता आहे त्यांनी जनतेच्या पैशातून स्वत:च्या पक्षाची व नेत्यांची प्रतिमा उजळ करणे हे लोकशाहीच्या मुलभूत संकल्पनेस पूर्णपणे छेद देणारे आहे. मुद्दा अखत्यारिचाकाही बाबी न्यायालयीन अधिकारकक्षेत मोडत नसल्यामुळे त्या सरकारवर सोडायला हव्या. धोरण आणि अन्य बाबींवर जनतेशी संपर्क साधण्यासाठी सरकारकडून जाहिरातींचा वापर केला जातो, असे सांगत अटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी न्यायालयाच्या हस्तक्षेपाला विरोध केला. न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळत जाहिरातींचा मजकूर आणि त्यावर होणारा खर्च करदात्यांच्या खिशातून दिला जात असल्यामुळे त्रिसदस्यीय समितीकडे मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्याचे काम सोपविले होते. मेनन यांच्यासह लोकसभेचे माजी सरचिटणीस टी.के. विश्वनाथन, माजी सॉलिसिटर जनरल रणजित कुमार यांचा समितीत समावेश होता.(लोकमत न्यूज नेटवर्क)