नवी दिल्ली: सध्या सोशल मीडियावर काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांचा एक व्हिडीओ वेगानं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते प्रियांका चोप्रा झिंदाबादच्या घोषणा देताना दिसत आहेत. हा व्हिडीओ काँग्रेसच्या जनसभेतला असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडीओमध्ये माजी आमदार सुरेंद्र कुमार यांचा उल्लेख आहे. याशिवाय दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष चोप्रादेखील यामध्ये दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ २२ सेकंदांचा आहे. त्यात घोषणा देणाऱ्या व्यक्तीनं गांधी कुटुंबांचा उल्लेख करताना प्रियांका यांचं आडनाव चुकवलं आहे. 'सोनिया गांधी झिंदाबाद, काँग्रेस पार्टी झिंदाबाद, राहुल गांधी झिंदाबाद, प्रियंका चोप्रा झिंदाबाद,' अशा घोषणा व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीनं दिल्या. त्यानंतर त्याला त्याची चूक लक्षात आली. मग लगेच दुसऱ्याच क्षणी 'सॉरी प्रियंका गांधी झिंदाबाद, सोनिया गांधी झिंदाबाद' म्हणत त्यानं घोषणाबाजी सुरू ठेवली. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
#WATCH Delhi: Slogan of "Sonia Gandhi zindabad! Congress party zindabad! Rahul Gandhi zindabad! Priyanka Chopra दिल्लीत पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे दिल्लीतलं वातावरण तापलं आहे. दिल्लीत सत्ताधारी आम आदमी पार्टी आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपा यांच्यात अनधिकृत वसाहतींच्या मुद्द्यावरुन श्रेयवादाची लढाई सुरू आहे. तर दिल्ली काँग्रेसनं रस्त्यावर उतरुन पोल खोल अभियान राबवण्यास सुरुवात केली आहे. आप आणि भाजपा अनधिकृत वसाहतींच्या मुद्द्याचं केवळ राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे.