भाजप सरकार गुंडांना खुले संरक्षण देतायत : प्रियंका गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 03:34 PM2020-01-08T15:34:59+5:302020-01-08T15:38:11+5:30
भाजपचे मंत्री जेलमधून बाहेर आलेल्या गुंडाच्या गळ्यात हार घालून स्वागत करतात.
नवी दिल्ली : अहमदाबादमध्ये एबीव्हीपी आणि एनएसयूआय कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यावरून काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप सरकार गुंडांना खुले संरक्षण देत असल्याचा आरोप प्रियंका गांधी यांनी केला आहे. तर या हिंसक घटनेला भाजपला जवाबदार ठरवत प्रियंका गांधी यांनी ट्वीट केलं आहे.
सोमवारी अहमदाबाद येथे एबीव्हीपीच्या कार्यालयाबाहेर जेएनयूमधील हिंसाचाराविरोधात आंदोलन होत होते. त्याचवेळी एनएसयूआय आणि एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर दोन्हीकडून एकमेकांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या हामाणारीत सुमारे 10 जण जखमी झाले होते. तर या घटनेला भाजप कारणीभूत असल्याचा आरोप करत, प्रियंका गांधी यांनी भाजपवर टीका केली आहे.
भाजप सरकार गुंडांना खुले संरक्षण देत आहे. तर भाजपचे मंत्री जेलमधून बाहेर आलेल्या गुंडाच्या गळ्यात हार घालून स्वागत करतात. आता तर रस्त्यावर सुद्धा कायद्याचा धाख उरला नसल्याचा आरोप प्रियंका गांधी यांनी केला आहे. तर त्यांनी व्हिडिओ शेयर करत, गुजरात सरकारबरोबर पोलिसांवर सुद्धा आरोप केले आहेत. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांवर एबीव्हीपीच्या गुंडांनी हल्ला केला असल्याचं प्रियंका गांधी म्हणाल्या.
भाजपा सरकार गुंडों को खुला संरक्षण दे रही है। पहले इनके मंत्री गुंडों को जेल से छूटने के बाद फूल माला पहनाते थे। अब तो सड़क पर ही कानून की आंख पर पट्टी बांध दी गई है। साफ दिख रहा है कि एबीवीपी के गुंडा तत्व शांतिपूर्ण प्रदर्शन करने वाले एनएसयूआई के कार्यकर्ताओं को पीट रहे हैं 1/2 pic.twitter.com/0QUSnA6CXx
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) January 8, 2020