Priyanka Gandhi : उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने (UPPSC) पीपीएसची परीक्षा पुढे ढकलली आहे. यावरून राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे. योगी सरकार तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करू इच्छित आहे, असे प्रियंका गांधी यांन म्हटले आहे. यासंदर्भात प्रियांका गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे.
प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की, यूपी पीसीएस प्रिलिम्सची परीक्षा दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. यूपी टेक्निकल एज्युकेशन सर्व्हिसेस-2021 च्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तसेच, वारंवार परीक्षा पुढे ढकलणे, पेपरफुटी आणि भ्रष्टाचाराच्या माध्यमातून तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करणे, हे भाजप सरकारचे धोरण बनले आहे, असे प्रियांका गांधी म्हणाल्या.
"भाजप दलितांकडून आरक्षणाचा अधिकारही हिसकावून घेत आहे"याचबरोबर, प्रियांका गांधी यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपवर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की, "स्पर्धक विद्यार्थीही यूपीपीसीएस परीक्षा दोन दिवसांत घेण्याच्या प्रस्तावाला विरोध करत आहेत. त्यांचा युक्तिवाद बरोबर आहे की, हीच परीक्षा दोन दिवसांत घेतली, तर नॉर्मसाइजेशनच्या नावाखाली पुन्हा स्केलिंगचा खेळ सुरू होईल. एकीकडे भाजप तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करत आहे, नोकऱ्या न देऊन मागासवर्गीय, दलित आणि वंचितांचा आरक्षणाचा अधिकारही हिरावून घेत आहे."
नेमक काय आहे प्रकरण?दरम्यान, उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने (UPPSC) प्रांतीय नागरी सेवा (PCS) प्राथमिक परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याची घोषणा केली आहे. परीक्षा पुढे ढकलण्याची यंदाची ही दुसरी वेळ आहे. आता डिसेंबरच्या मध्यात परीक्षा घेतली जाण्याची शक्यता आहे. अधिकृत अपडेटसाठी उमेदवारांना नियमितपणे UPPSC वेबसाइट uppsc.up.gov.in तपासण्यास सांगितले जात आहे.