नवी दिल्ली : देशातील वाढती बेरोजगारीच्या मुद्यावरून काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. प्रियंका यांनी ट्वीट करत सरकारवर टीका केली आहे. देशातील सात प्रमुख क्षेत्रांमध्ये सुमारे साडेसात कोटी लोक बेरोजगार झाले आहेत, त्यामुळे सरकार यावर बोलायला तयार नसल्याचे प्रियंका गांधी म्हणाल्यात.
देशभरातील लाखो तरुणांच्या हातात डिग्री असून सुद्धा त्यांना नोकरी मिळत नसल्याचे चित्र आहे. तर आर्थिक मंदीमुळे बेरोजगारी वाढली असून अनेक कंपन्यात कामगारांना कामावरून काढण्यात येत आहे. त्यामुळे सरकारसमोर बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तर याच मुद्यावरून काँग्रेसकडून भाजप सरकारवर टीका करण्यात आली आहे.
प्रियंका गांधी यांनी एका हिंदी वृतपत्रामध्ये छापुन आलेल्या आकडेवारीचा दाखला देत म्हंटले आहे की, नोकरी देण्याच्या सर्व मोठ्या आश्वासनांचे हे वास्तव आहे. देशातील सात प्रमुख क्षेत्रांमध्ये सुमारे साडेसात कोटी लोक बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे सरकार बेरोजगारीच्या मुद्यावर बोलायला तयार नसल्याचा खोचक टोला प्रियंका गांधी यांनी यावेळी लगावला.