नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये प्रियंका गांधी केवळ उत्तर प्रदेशातच नव्हे, तर संपूर्ण देशभरात काँग्रेसचा प्रचार करणार आहेत, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले. त्यामुळे भाजपा सावध झाला असून प्रियंकांच्या वादळाला तोंड कसे द्यायचे याची रणनीती तो पक्ष आखत आहे.प्रियंका गांधी यांनी राष्ट्रीय स्तरावर प्रचार केल्यास त्यांच्या राजकीय कामगिरीचा विस्तार होण्यासही मदत होणार आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर लगेचच काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होणार असून त्यात प्रियंका गांधी यांना प्रचार मोहिमेत कोणती जबाबदारी द्यायची, यावर चर्चा होणार आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस व पक्षाच्या उत्तर प्रदेशमधील पूर्व भागाच्या प्रभारी या नात्याने त्यांनी गेल्या आठवड्यात सक्रिय राजकारणात प्रवेश केला. त्या सध्या कुटुंबियांसोबत विदेश दौऱ्यावर गेल्या असून, येत्या काही दिवसांत भारतात परततील. त्या ४ फेब्रुवारीला रायबरेलीला भेट देतील आणि त्यानंतर त्यांच्या राजकीय हालचालींना आणखी वेग येईल.राहुल गांधींना मोठी मदतगुलाम नबी आझाद म्हणाले की, प्रियंका गांधी राष्ट्रीय प्रचार मोहिमेच्याही सदस्य आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष, पंतप्रधान देशभर प्रचार करीत. मात्र देश एक व्यक्ती सर्वच ठिकाणी जाऊ शकत नाही. त्यामुळे प्रियंकाही प्रचारात सहभागी होतील. तरुण मतदारांना काँग्रेसकडे आकर्षित करण्यावर प्रियंका व राहुल गांधी भर देतील. भाजपाचा परंपरागत मतदारही तुटावा यासाठीही काँग्रेस प्रयत्नशील राहील.
प्रियंका गांधी देशभरात करणार प्रचार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 6:57 AM