शेतकऱ्यांनो, एकही पाऊल मागे घेऊ नका, आम्ही तुमच्या पाठिशी आहोत: प्रियंका गांधी
By देवेश फडके | Published: February 10, 2021 05:10 PM2021-02-10T17:10:28+5:302021-02-10T17:16:07+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका, चीन, पाकिस्तान अशा अनेकविध देशात गेले. मात्र, ज्या शहरात राहतात, तेथील सीमेवर आले नाहीत. शेतकऱ्यांनो, काही झाले तरी एकही पाऊल मागे हटू नका. आम्ही तुमच्या पाठिशी आहोत. जोपर्यंत अन्यायकारक असलेले कृषी कायदे रद्द होत नाहीत, तोपर्यंत आपल्या मतांवर ठाम राहा, असे आवाहन प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी यावेळी बोलताना केले. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली.
सहारनपूर : किसान महापंचायतच्या माध्यमातून काँग्रेसउत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा आपली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी आज (बुधवारी) आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी प्रियंका गांधी यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आतापासून तयारीला लागली आहे, असे सांगितले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रियंका गांधी किसान महापंचायमध्ये सहभागी झाल्याचे म्हटले जात आहे. (priyanka gandhi criticized bjp government in kisan mahapanchayat at saharanpur)
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका, चीन, पाकिस्तान अशा अनेकविध देशात गेले. मात्र, ज्या शहरात राहतात, तेथील सीमेवर आले नाहीत. शेतकऱ्यांनो, काही झाले तरी एकही पाऊल मागे हटू नका. आम्ही तुमच्या पाठिशी आहोत. जोपर्यंत अन्यायकारक असलेले कृषी कायदे रद्द होत नाहीत, तोपर्यंत आपल्या मतांवर ठाम राहा, असे आवाहन प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी यावेळी बोलताना केले. तत्पूर्वी, सहारनपूर येथील शाकंभरी मंदिरात जाऊन प्रियंका गांधी यांनी दर्शन घेतले आणि त्यानंतर किसान महापंचायतमध्ये सहभागी झाल्या.
In 1955, Jawaharlal Nehru had made laws against hoarding. But this law has been scrapped by the BJP govt. This new law will help the 'Arabpatis'. They will decide the price of farmers' produce: Priyanka Gandhi Vadra, Congress, at Kisan Mahapanchayat in Saharanpur pic.twitter.com/qxVc9WueUe
— ANI UP (@ANINewsUP) February 10, 2021
पंतप्रधानांकडून शेतकऱ्यांचा अपमान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. शेतकऱ्यांना आंदोलजीवी म्हटले गेले. याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? आंदोलन करत असलेले शेतकरी आपल्या मातीसाठी, जमिनींसाठी लढा देत आहेत. आंदोलकांना देशद्रोही म्हणणारे देशभक्त असूच शकत नाही, अशी बोचरी टीकाही प्रियंका गांधी यांनी केली.
क्रोनीजीवी... देश विकायला निघालाय तो, आंदोलनजीवीवरुन राहुल गांधींचा टोला
हृदयात केवळ उद्योगपतींसाठी स्थान
५६ इंची छाती असलेल्या व्यक्तींच्या हृदयात केवळ उद्योगपतींना स्थान आहे, असा दावा करत कृषी कायद्याच्या माध्यमातून शेती आणि शेतकरी यांना संपुष्टात आणण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचा आरोपही प्रियंका गांधी यांनी केला. तसेच काँग्रेसचे सरकार आल्यास कृषी कायदे रद्द करण्यात येतील, असे आश्वासनही प्रियंका गांधी यांनी यावेळी बोलताना दिले.
दरम्यान, राहुल गांधींनी केवळ एक ट्विट करून मोदींनी क्रोनीजीवी असे म्हटलेय. क्रोनी म्हणजे मैत्रीजीवी... असे म्हणत राहुल गांधींनी मोदींना टोला लगावला. तसेच, देश विकायला लागलाय तो... असे म्हणत राहुल गांधांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीकाही केली. बाबा रामदेव, किरण बेदी, अण्णा हजारे आणि त्यांच्या लोकांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे वक्तव्य जरा निर्दयी वाटत नाही का? असा खोचक प्रश्न शशी थरुर यांनी आपल्या ट्विटमधून विचारला.