नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवरून काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी योगी सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपच्या राजवटीत महिलांवरील गुन्ह्यांचा आलेख वाढला आहे, परंतु राज्य सरकार याची जवाबदारी घेत नसल्याचा आरोप प्रियंका यांनी केला आहे. प्रियंका गांधी यांनी ट्वीट करत हे आरोप केले आहे.
प्रियंका गांधी यांनी महिला अत्याचाराच्या मुद्यावरून भाजप आणि योगी सरकारवर टीका केली आहे. उत्तर प्रदेशातील महिला अत्याचाराच्या घटना देवसेंदिवस वाढत आहे. अशा घटना रोज घडत असल्याचे समोर येत आहे. तर फिरोजाबादमध्ये पीडित मुलीच्या वडिलांची हत्या करण्यात आली. तसेच सीतापुरात मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. अशा घटना घडत असताना सरकार कुठे आहे? असा सवाला त्यांनी यावेळी उपस्थित केला.
प्रियंका गांधी ह्या उत्तर प्रदेशची काँग्रेसच्या प्रभारी असून सोशल मीडियाच्या माध्यमातून योगी सरकारवर त्या सतत निशाणा साधत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर गेल्या काही दिवसांपासून त्या सतत उत्तर प्रदेशच्या दौर्यावर जात असल्याचे सुद्धा पाहायला मिळत आहे. स्थानिक नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन त्या विधानसभा निवडणुकांसाठी रणनीती तयार करत असल्याचे सुद्धा बोलले जात आहे.