लोकसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान प्रियंका गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जबरदस्त निशाणा साधला आहे. "लोकसभा निवडणुकीचे निकाल असे आले नसते, तर हे लोक संविधान बदलायलाही तयार होते," असे प्रियांका गांधी वाड्रा यांनी म्हटले आहे. वायनाडमधून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर लोकसभेतील हे त्यांचे पहिलेच भाषण होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवरही थेट टीका केली. "आजच्या राजाला वेष बदलणे तर माहीत आहे, मात्र जनतेत जाण्याची आणि टीका ऐकण्याची हिम्मत नाही," असे प्रियांका म्हणाल्या.
प्रियांका म्हणाल्या, आम्ही संविधानाची ज्योज जळताना बघितली आहे आणि हे एक सुरक्षा कवच असल्याचेही समजले आहे. एक असे सुरक्षा कवच, जे देशातील नागरिकांना सुरक्षित ठेवते. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कवच आहे. मात्र, दुःखाची गोष्ट म्हणजे, आपले सत्ताधारी पक्षातील सहकारी, जे मोठ मोठ्या गप्पा मारतात, त्यांनी गेल्या 10 वर्षांत हे सुरक्षा कवच तोडण्याचा पूर्ण प्रयत्न केला. संविधानात सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचे वचन आहे. हे सुरक्षा कवच तोडण्याचे काम सुरू झाले आहे. लॅटरल एन्ट्री आणि खासगीकरणाच्या माध्यमाने हे सरकार आरक्षण कमकुवत करण्याचे काम करत आहे.
प्रियांका पुढे म्हणाल्या, जर लोकसभा निवडणुकीत हे निकाल आले नसते तर, यांनी संविधान बदलायलाही सुरुवात केली असती. खरे तर, हे वारंवार संविधान-संविधान करत आहेत, कारण यांना, देशातील जनता संविधान बदू देणार नाही, हे माहीत झाले आहे. यांना पराभूत होता होता हे लक्षात आले आहे.
पंतप्रधान मोदींवर निशाणा - पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना प्रियांका म्हणाल्या, "पंतप्रधान संविधान कपाळावर लावतात, पण जेव्हा न्यायासाठी आवाज येतो, तेव्हा त्यांच्या कपाळावर सुरकुतीही नसते. भारतीय राज्यघटना हे संघाचे विधान नाही. हे त्यांना समजलेले नाही. करोडो देशवासीयांच्या हृदयात एकमेकांबद्दल प्रेम आहे, द्वेष नाही. यांच्या फुटीरतावादी धोरणांचे परिणाम आपण रोज पाहतो. राजकीय फायद्यासाठी संविधान तर सोडाच, पण देशाची एकात्मताही पणाला लावतील. संभलमध्ये पाहिले, मणिपूरमध्ये पाहिले. ते म्हणतात की देशाचे वेगवेगळे भाग आहेत. पण आपले संविधान सांगते की, हा देश एक आहे आणि एकच राहील. जिथे अभिव्यक्तीचे संरक्षक कवच होते, तिथे त्यांनी भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. सत्ताधारी पक्ष 75 वर्षांसंदर्भात बोलतात. पण या वर्षांत राज्यघटनेची ज्योत कधीही मंदावली नाही. जनतेने निर्भयपणे निदर्शने केले. ती संतप्त झाल्यावर तिने सरकारला आव्हान दिले. बड्या नेत्यांवरही आरोप केले. पण आज हे वातावरण नाही. आज जनतेला सत्य बोलण्यापासून रोखले जाते. पत्रकार असो की विरोधी पक्षनेते, सर्वांची तोंडे बंद केली जातात. असे भीतीचे वातावरण ब्रिटिश सरकारच्या काळात होते. एवढेच नाही, तर "आजचे राजे भेष तर बदलतात, पण ना जनतेत जातात, ना टीका ऐकण्याची हिंमत आहे," असेही प्रियांका म्हणाल्या.