लखनौ - प्रियंका गांधी यांच्या सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा झाल्यानंतर देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वारे वाहू लागले आहेत. त्यातच लोकसभा आणि विधानभेतील जागांच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्येप्रियंका गांधी यांच्या आगमनामुळे पक्षाला गतवैभव मिळेल, अशी काँग्रेसला अपेक्षा आहे. आता राज्यातील आपल्या पारंपरिक सवर्ण मतदारांना पुन्हा एकदा पक्षाकडे खेचण्यासाठी मोठी खेळी खेळण्याची तयारी काँग्रेसने केली असून, 2022 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून प्रियंका गांधी यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आजपासून उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. प्रियंका गांधी यांचा सक्रीय राजकारणातील प्रवेश हा लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून झाला असल्याचे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात 2022 मध्ये राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर पक्षाची नजर आहे. तसेच या निवडणुकीसाठी प्रियंका यांना मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार बनवण्यासाठी पक्ष प्रयत्नशील आहे. प्रियंका गांधी यांच्या सोमवारी होणाऱ्या रोड शो पूर्वी काही काँग्रेसी नेत्यांनी तसे संकेतही दिले आहेत. दरम्यान, एकेकाळी उत्तर प्रदेशमध्ये एकहाती वर्चस्व राखणाऱ्या काँग्रेसची सध्या बिकट अवस्था झाली आहे. 2017 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ 7 जागांवर विजय मिळाला होता. 1989 नंतर पक्ष उत्तर प्रदेशमधील सत्तेतून बाहेर आहे. त्यामुळे प्रियंका गांधी यांना चेहरा म्हणून समोर आणले तर पक्षाला संजीवनी मिळेल, अशी अपेक्षा काँग्रेस नेत्यांना आहे.
2022 मध्ये प्रियंका गांधी बनू शकतात काँग्रेसच्या उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 10:41 AM
प्रियंका गांधी यांच्या सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा झाल्यानंतर देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वारे वाहू लागले आहेत.
ठळक मुद्दे प्रियंका गांधी यांच्या सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा झाल्यानंतर देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वारे वाहू लागले आहेत.लोकसभा आणि विधानभेतील जागांच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये प्रियंका गांधी यांच्या आगमनामुळे पक्षाला गतवैभव मिळेल, अशी काँग्रेसला अपेक्षा आहे. आपल्या पारंपरिक सवर्ण मतदारांना पुन्हा एकदा पक्षाकडे खेचण्यासाठी 2022 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून प्रियंका गांधी यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.