Priyanka Gandhi ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. देशात एनडीएला २९२ जागा मिळाल्या आत, तर इंडिया आघाडीला २३४ जागा मिळाल्या आहेत. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी गेल्या काही दिवसापासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सभा घेतल्या होत्या. दरम्यान, आता निकालानंतर प्रियांका गांधी यांनी राहुल गांधीसाठी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये प्रियांका गांधी यांनी राहुल गांधी यांचे कौतुक केले आहे.
भाजपचा जीव टांगणीला! किंगमेकर नितीशकुमार, तेजस्वी यादव एकाच विमानात; दिल्लीला रवाना
"तुम्ही उभे राहिलात, ते तुम्हाला काय बोलले, तरीही तुम्ही कधीही मागे हटले नाही, कितीही अडथळे आले तरी तुम्ही थांबला नाहीत. त्यांनी तुमच्या विश्वासावर कितीही शंका घेतली, त्यांनी पसरवलेल्या खोट्या गोष्टींचा प्रचंड प्रचार करूनही तुम्ही सत्यासाठी लढणे कधीच थांबवले नाही तुम्ही तुमच्या हृदयात प्रेम, सत्य आणि दयाळूपणाने लढलात. जे तुम्हाला पाहू शकले नाहीत, ते आता तुम्हाला भेटतील, पण आपल्यापैकी काहींनी तुम्हाला नेहमीच पाहिले आणि ओळखले आहे की तुम्ही सर्वांपेक्षा शूर आहात,असं कौतुक प्रियांका गांधी यांनी राहुल गांधी यांचं केलं.
“गरीब जनतेने संविधान वाचवले"
या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली या दोन्ही मतदारसंघातून निवडणूक रिंगणात होते. विशेष म्हणजे वायनाड आणि रायबरेली या दोन्ही ठिकाणी राहुल गांधी यांनी मोठ्या आघाडीसह विजय मिळवला. पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीतील पक्षांचे आभार मानले. राहुल गांधी म्हणाले की, इंडिया आघाडी आणि काँग्रेस पक्ष केवळ कोणत्या एका राजकीय पक्षाविरोधात लढली नाही. ही निवडणूक आम्ही भाजपा, देशातील संस्था, देशातील प्रशासकीय व्यवस्था, गुप्तचर यंत्रणा, सीबीआय, ईडी या सर्वांविरोधात लढलो होतो. या सगळ्या संस्थांवर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी कब्जा केला. धमकावले आणि घाबरवले, या शब्दांत राहुल गांधी यांनी भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले