शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी भाजप कार्यकर्त्यांवर केली पुष्पवृष्टी, कार्यकर्त्यांनी दिल्या जय श्रीरामच्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 10:14 PM

UP Election 2022: योगी आदित्यनाथ यांच्या सभेवरुन परतत असताना कार्यकर्त्यांनी प्रियंकांना पाहून घोषणा सुरू केल्या, त्याला प्रियंका गांधींनी पुष्पवृष्टीने प्रत्युत्तर दिले.

हरदोई: बुलंदशहरनंतर आता उत्तर प्रदेशातील हरदोईमधूनही राजकारणाचे सुंदर चित्र समोर आले आहे. काँग्रेस सरचिटणीस आणि यूपी प्रभारी प्रियांका गांधी यांनी भाजप कार्यकर्त्यांवर पुष्पवृष्टी केली. प्रियांका गांधी यांना पाहताच भाजप कार्यकर्त्यांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्या. प्रत्युत्तर म्हणून प्रियांकांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. दरम्यान, त्यांनी भाजपचे मंडल अध्यक्ष कमल आणि विपिन यांच्याशी हस्तांदोलनही केले. यावेळी काही भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत फोटोही काढले.

दोन्ही सभांचा मार्ग एकच होतासोमवारी प्रियंका गांधी यांचा कार्यक्रम मधुगंज शहरातील पोलीस स्टेशनसमोरील मैदानात होता. त्या लखनौहून दुपारी 12:55 वाजता माधौगंजला पोहोचणार होत्या. वाटेत मल्लवन शहरात सीएम योगी आदित्यनाथ यांचा कार्यक्रमही होता. दोन्ही सभांकडे जाणारा रस्ता एकच होता. सीएम योगी आणि प्रियंका यांच्या स्थळामध्ये सुमारे 8 किलोमीटरचे अंतर होते. मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम 1 वाजता होता. त्यामुळे प्रियंका गांधी वाड्रा यांचा कार्यक्रम थोडा उशिरा झाला. दुपारी 1.45 वाजता मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमानंतर ते हेलिकॉप्टरने रवाना झाले.

भाजप कार्यकर्त्यांवर पुष्पवृष्टीमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावरून कार्यकर्ते परतत होते. त्यानंतर बंगारामू ते मल्लवनला जाताना त्यांनी प्रियांका गांधी यांची भेट घेतली. प्रियंका मधुगंज सभेसाठी जात होती. यादरम्यान मल्लावन शहरात येणारे फरहत नगर रेल्वे स्टेशनचे क्रॉसिंगही बंद करण्यात आले. यावेळी मोठा ट्रॅफिक जाम झाला होता. यावेळी काही भाजप कार्यकर्त्यांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्या, त्या प्रत्युत्तर म्हणून प्रियांका गांधींनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली.

प्रियांकांनी जयंत आणि अखिलेश यांचाही सामना केला यापूर्वी 3 फेब्रुवारी रोजी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचा रोड शो दरम्यान सपा नेते अखिलेश यादव आणि आरएलडी नेते जयंत चौधरी यांच्याशी सामना झाला होता. तिन्ही नेते बुलंदशहरमध्ये रोड शो करत होते. त्यावेळीही प्रियांकाने दोन्ही नेत्यांना हात जोडून अभिवादन केले. अखिलेश आणि जयंत यांनीही प्रियांकाचे दोन्ही हात वर करुन अभिवादन स्वीकारले. यावेळी एका बाजूने अखिलेश यादव आणि जयंत चौधरी यांच्या घोषणा दिल्या जात होत्या, तर दुसरीकडे प्रियंका गांधी जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात होत्या. 

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Priyanka Gandhiप्रियंका गांधीBJPभाजपा