नवी दिल्ली - मध्य प्रदेशच्या उज्जैनमधून गँगस्टर विकास दुबेला अटक करण्यात आल्यानंतर शुक्रवारी सकाळी त्याचा एन्काऊंटर झाला. आठ पोलिसांची हत्या घडवणारा विकास दुबे एन्काऊंटरमध्ये ठार झाला. आज त्याला कानपूरला नेलं जात असताना पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. यानंतर विकास दुबेनं पोलिसांकडील बंदूक घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या चकमकीत विकास दुबे ठार झाल्याची माहिती मिळत आहे. एन्काऊंटरनंतर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी सुद्धा याबाबत एक ट्विट केले आहे.
प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. विकास दुबे एन्काऊंटरनंतर त्यांनी एक सवाल उपस्थित केला आहे. "गुन्हेगाराचा शेवट झाला पण गुन्हे आणि त्यांना संरक्षण देणाऱ्याचे काय?" असं प्रियंका यांनी म्हटलं आहे. याआधीही त्यांनी गुरुवारी याबाबत एक ट्विट केलं होतं. कानपूर हत्याकांडमध्ये उत्तर प्रदेश सरकारने प्रचंड अलर्ट राहून काम करणे अपेक्षित होते. पण ते अपयशी ठरले. अलर्ट असूनही आरोपी उज्जैनपर्यंत पोहोचला असं त्यांनी म्हटलं होतं.
समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दुबे एन्काऊंटरवरून सरकारवर निशाणा साधला आहे. विकास दुबे ठार झाल्यानंतर अखिलेश यादव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. "सरकार पलटी होऊ नये म्हणून कार पलटली" असं म्हणत योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे. "कार पलटी झाल्यावर विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला हे स्पष्टीकरण संभ्रमात टाकणारे आहे. पळून जायचे होते तर त्याने स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन का केले?, कार पलटी झालेली नाही तर सरकार पलटी होण्यापासून वाचवण्यासाठी हा सर्व प्रकार घडवून आणला आहे" असा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Vikas Dubey Encounter : "सरकार पलटी होऊ नये म्हणून कार पलटली", अखिलेश यांचा हल्लाबोल
Vikas Dubey Encounter : लेडी सिंघमने आवळल्या विकास दुबेच्या मुसक्या, जाणून घ्या नेमकं काय घडलं
CoronaVirus News : MASK लावायचा कंटाळा येतो?, 'हा' Video पाहिलात तर कधीच हटवणार नाहीत मास्क
CoronaVirus News : हँड सॅनिटायझरची खरेदी करताना 'या' गोष्टी चेक करता का?; FDAने दिला मोलाचा सल्ला