प्रियांका गांधींनी काल बॅगेवर पॅलिस्टाइन लिहिले, आज बांगलादेशमधील हिंदूंचा मुद्दा केला उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 13:45 IST2024-12-17T13:44:06+5:302024-12-17T13:45:57+5:30

काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी काल संसदेत पॅलिस्टाइन लिहिलेनी समर्थनार्थ बॅग आणली होती. आता आज बांगलादेशमधील मुद्द्यावर बॅग आणली आहे.

Priyanka Gandhi raised the issue of Palestine from her bag yesterday, and Hindus in Bangladesh today | प्रियांका गांधींनी काल बॅगेवर पॅलिस्टाइन लिहिले, आज बांगलादेशमधील हिंदूंचा मुद्दा केला उपस्थित

प्रियांका गांधींनी काल बॅगेवर पॅलिस्टाइन लिहिले, आज बांगलादेशमधील हिंदूंचा मुद्दा केला उपस्थित

काल संसदेत काँग्रेस खासदार प्रियांका गांधी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ बॅग घेऊन पोहोचल्या होत्या. यानंतर भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. तर दुसरीकडे पाकिस्तानमधील एका नेत्याने त्यांचे कौतुक केले होते. यानंतर आता प्रियांका गांधी यांनी दुसऱ्या दिवशी बांगलादेशचा मुद्दा घेतला आहे.

प्रियांका गांधी यांनी नवीन बॅगेवर बांगलादेशचा मुद्दा घेतला आहे. प्रियांका गांधी आज एक नवीन बॅग घेऊन आल्या आहेत, यामध्ये बांगलादेशच्या हिंदूंच्या समर्थनार्थ घोषणा लिहिल्या होत्या. बॅगेवर लिहिले होते- 'बांगलादेशातील अल्पसंख्यांकांसोबत उभे रहा'. बांगलादेशात अत्याचाराला सामोरे जाणाऱ्या हिंदूंना  न्याय मिळावा या मागणीसाठी प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसच्या अनेक खासदारांनी मंगळवारी संसदेच्या संकुलात निदर्शने केली.

शेवटच्या श्वासापर्यंत निभावलं नातं... पतीच्या मृत्यूनंतर अवघ्या २० मिनिटांत पत्नीचाही मृत्यू

बांगलादेशी हिंदूंच्या समर्थनार्थ घोषणा लिहिलेल्या बॅग्जसह काँग्रेस खासदारांनी आज संसदेच्या संकुलात निषेध केला. त्यांनी घोषणाबाजी केली आणि बांगलादेशातील अल्पसंख्याकांना न्याय मिळावा यासाठी सरकारला विनंती केली.

काँग्रेस खासदार प्रियांका गांधी हँडबॅगसह संसदेत 'स्टँड विथ हिंदू आणि ख्रिश्चन ऑफ बांगलादेश' असे लिहिलेले होते. कालच त्यांनी पॅलेस्टाईनी बाबत बॅग आणली होती. कालही प्रियांका गांधी एक बॅग घेऊन आल्या होत्या, यावर पॅलेस्टाईन लिहिले होते.

सोमवारी लोकसभेत बोलताना प्रियांका गांधी यांनी बांगलादेशातील हल्ल्यातील पीडितांसाठी सरकारकडे मदतीची मागणी केली होती. त्या म्हणाल्या की, "बांगलादेशातील हिंदू आणि ख्रिश्चन या दोन्ही अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराचा मुद्दा सरकारने उपस्थित केला पाहिजे. बांगलादेश सरकारशी चर्चा करून पीडितांना पाठिंबा द्यावा.

Web Title: Priyanka Gandhi raised the issue of Palestine from her bag yesterday, and Hindus in Bangladesh today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.