नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांची बुधवारपासून उत्तर प्रदेशात रथयात्रा सुरू होणार असून, त्याची सुरुवात त्या अयोध्येतील हनुमान गढीतील पूजेने होणार आहे. प्रियांका गांधी यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आणि अयोध्या दौऱ्यामुळे भाजपा नेते अस्वस्थ झाले असून, त्यांनी प्रियांकावर वाटेल ती टीका सुरू केली आहे.प्रियांका गांधी यांनी अलीकडेच गंगेतून बोटीतून आसपासच्या गावांचा दौरा केला. त्यांच्या दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्या आता रथयात्रा काढणार असून, त्या या टप्प्यात फैजाबाद, सुलतानपूर, अमेठी, रायबरेली व उन्नाव या मतदारसंघांत जाणार आहेत. तीन दिवस चालणाºया या दौºयात त्या ३२ ठिकाणी थांबून लोकांशी संवाद साधणार आहेत. या दौºयात त्या काही सभा घेण्याचीही शक्यता आहे. मात्र त्या सभांचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही.त्या २७ मार्च रोजी दिल्लीहून रेल्वेने फैजाबादला जाणार आहेत. ते अंतर सुमारे ६00 किलोमीटरचे आहे. फैजाबादहून त्या अयोध्येला जातील. ते अंतर सुमारे सात किलोमीटरचे असले तरी त्यांच्या यात्रेला होणारी गर्दी पाहता, त्यांना अयोध्येला पोहोचण्यास किमान एक तास लागेल, असा अंदाज आहे. अयोध्येतून खºया अर्थाने त्यांच्या रथयात्रेला सुरुवात होईल. प्रियांका गांधी यांच्या या दौºयाबद्दल अयोध्येत प्रचंड उत्सुकता आहे.उत्तर प्रदेश सरकारने ‘शिक्षामित्र' योजनेच्या अंतर्गत भरती केलेल्या कंत्राटी शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याऐवजी भाजपाचे नेते निवडणूक प्रचारासाठी बनविलेल्या टी-शर्टचे मार्केटिंग करण्यात गुंतले आहेत अशी टिका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केली आहे. त्या म्हणाल्या की, कंत्राटी शिक्षकांना अतिशय अपुरे वेतन मिळत असून त्यातील काही जणांनी आर्थिक ओढगस्तीला कंटाळून आत्महत्या केली आहे. आपल्या मागण्यांसाठी निदर्शने करणाºया या शिक्षकांवर लाठीमारही करण्यात आला. त्यांच्याविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याद्वारे कारवाई करण्यात आली. वेतनात वाढ करा, सहाय्यक शिक्षक म्हणून नियुक्ती करा इतक्याच त्यांच्या मागण्या आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून भाजपाचे नेते फक्त निवडणूक प्रचारात मग्न आहेत असेही प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे.रामभक्त असे वर्णन; अनेक ठिकाणी लागले पोस्टर्सयाआधी गंगा यात्रा करताना त्यांनी वाराणसीच्या काशी विश्वेश्वर मंदिरात जाऊ न पूजा केली होती. आता अयोध्येला त्या जाणार असल्याने उत्तर प्रदेशच्या बºयाच भागांत तसेच त्या ज्या ठिकाणी जाणार आहेत, तिथे प्रियांका गांधी व राहुल गांधी यांच्या छायाचित्रांची पोस्टर्स लागली असून, त्या दोघांचा उल्लेख रामभक्त असा करण्यात आला आहे.
प्रियांका गांधी यांची बुधवारपासून रथयात्रा; अयोध्येच्या हनुमान गढीचे घेणार दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 5:30 AM