प्रियांका गांधी Palestine लिहिलेली बॅग घेऊन पोहोचल्या संसदेत, दिला थेट मेसेज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 13:44 IST2024-12-16T13:43:22+5:302024-12-16T13:44:02+5:30
priyanka gandhi congress palestine support bag picture amid hamas israel war

प्रियांका गांधी Palestine लिहिलेली बॅग घेऊन पोहोचल्या संसदेत, दिला थेट मेसेज
काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांचे पॅलिस्टाइन प्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. प्रियंका "Palestine" लिहिलेली बॅग घेऊन संसदेत पोहोचल्याचा एक फोटो समोर आला आहे. या बॅगच्या माध्यमाने प्रियांका गांधी पुन्हा एकदा पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ दिसून आल्या. एवढेच नाही तर त्यांनी थेट मेसेजही दिला आहे.
प्रियांका गांधी यांनी पहिल्यांदाच पॅलेस्टाइनचे समर्थन केले आहे, असे नाही. त्यांनी नुकतेच भारतात येऊन गेलेले पॅलेस्टाइनचे राजदूत अबेद एलराजेग अबू जाझर (Abed Elrazeg Abu Jazer) यांची भेटही धेतली होती. यावेळी, पॅलेस्टाइच्या राजदुताने वायनाड लोकसभ निवडणुकीतील विजयाबद्दल प्रियांका गांधी यांचे अभिनंदनही केले होते.
प्रियंका गांधीनीं दिला असा मेसेज -
या भेटीदरम्यान प्रियांका गांधी यांनी पॅलेस्टाइनला असलेले आपले समर्थन स्पष्टपणे प्रकट केले होते. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यासाठी पॅलेस्टाइनच्या नागरिकांच्या संघर्षाला समर्थनासंदर्भात भाष्य केले होते. त्या म्हणाल्या, आपण लहाणपणापासूनच पॅलेस्टाइनच्या हितांसाठी जगत आहोत आणि याच्या न्यायावर विश्वास आहे. याशिवाय त्यांनी पॅलेस्टाइनचे नेते यासिर अराफात यांच्या भारत दौऱ्यादरम्यान अनेक वेळा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधीपासून त्यांच्या भेटीचाही उल्लेख केला होता.
इस्रायलचा निषेध -
पॅलेस्टाइच्या राजदुतांना भेटल्या तेव्हा प्रियांका गांधी यांनी हमास आणि इस्राइल यांच्यात सुरू असलेल्या युद्धावरही भाष्य केले होते. यावेळी त्यांनी, गाझामध्ये सुरू असलेल्या इस्रायली लष्कराच्या कारावाईचाही निषेध केला. तसेच परिसरात होत असलेला विध्वंसाबद्दल दु:ख व्यक्त केले होते. प्रियांका म्हणाल्या होत्या, ज्याज्या महिलांनी या युद्धात आपले मूल गमावले आहे, त्या सर्व महिलांप्रति मी सहवेदना व्यक्त करते. यावेळी त्यांनी प्रत्येक देशाला इस्राइली सरकारच्या हल्ल्याचा निषेध करण्याचे आणि ते थांबवण्याचे आवाहनही केले होते.