बंगल्यात आणखी काही दिवस राहू द्या, प्रियंका गांधींनी केली मोदींना विनंती?, जाणून घ्या सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 11:13 AM2020-07-14T11:13:09+5:302020-07-14T11:20:47+5:30
प्रियंका यांना 1 ऑगस्ट 2020 पर्यंत बंगला खाली करण्यासंबंधी नोटीस पाठविण्यात आली आहे.
नवी दिल्ली - केंद्रातील मोदी सरकारने काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना दिल्लीतील लोधी इस्टेटमधील सरकारी बंगला खाली करण्यास सांगितले आहे. प्रियंका यांना 1 ऑगस्ट 2020 पर्यंत बंगला खाली करण्यासंबंधी नोटीस पाठविण्यात आली आहे. त्यानंतर आता प्रियंका गांधी सरकारी बंगला सोडून खासगी निवासस्थानी जाणार आहेत. मात्र त्यानंतर बंगल्यात आणखी काही दिवस राहू द्या अशी विनंती प्रियंका गांधी यांनी पंतप्रधानांना केल्याची माहिती समोर आली होती.
पुढील काही दिवस आपल्याला बंगल्यात राहण्याची परवानगी देण्यात यावी अशी विनंती प्रियंका यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केल्याचं वृत्त काही ठिकाणी प्रसिद्ध झालं होतं. मात्र यावर आता स्वत: प्रियंका गांधी यांनी स्पष्टीकरण दिलं असून हे वृत्त फेटाळून लावलं आहे. अशी कोणतीही मागणी आपण केली नसल्याचंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून प्रियंका गांधी यांनी याबाबतचे ट्विट केले आहे.
"मी अशाप्रकारची कोणतीही विनंती सरकारकडे केली नाही. मला 1 जुलै रोजी बंगला रिकामा करण्याचं पत्र देण्यात आलं. त्यानुसार मी 1 ऑगस्ट रोजी 35 लोधी इस्टेटमधील माझा सरकारी बंगला रिकामा करणार आहे" असं ट्विट प्रियंका यांनी केलं आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी विकास मंत्रालयाने त्यांना सरकारी बंगला सोडण्यासंबंधी दिलेल्या नोटीसमुळे प्रियंका गांधी यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता हा बंगला एका भाजपा नेत्याला मिळणार आहे.
भाजपाच्या 'या' नेत्याला मिळणार प्रियंका गांधींचा बंगला; 'हे' आहे कारण
भाजपाचे राष्ट्रीय प्रसारमाध्यम प्रमुख आणि राज्यसभा सदस्य अनिल बलूनी यांना हा बंगला मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. "प्रियंका गांधी यांचा बंगला हा आता अनिल बलूनी यांना देण्यात आला आहे. त्यांनी तशी विनंती केली होती. प्रियंका गांधी यांनी बंगला रिकामा केल्यानंतरच बलूनी यांना त्याचा ताबा देण्यात येईल" अशी माहिती केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने दिली आहे. बलूनी यांनी आपल्या प्रकृतीच्या कारणास्तव हा बंगला देण्याची विनंती केली होती. त्यांच्यावर कॅन्सरवरील उपचार करण्यात आले आहेत. त्यानंतर आता बंगला दिला असल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : डॉक्टरने रुग्णाचा मृतदेह स्मशानभूमीत नेण्यामागे 'हे' आहे कारण; वाचून तुम्हीही कराल भरभरून कौतुकhttps://t.co/6uolorHrGN#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia#CoronaWarriors
— Lokmat (@MiLOKMAT) July 14, 2020
महत्त्वाच्या बातम्या
Vikas Dubey Encounter : विकास दुबेचा आणखी एक प्लॅन आला समोर, रिक्षाचालकाने केला खुलासा
Google भारतात 75 हजार कोटींची गुंतवणूक करणार, सुंदर पिचाईंची मोठी घोषणा
Rajasthan Political Crisis : "राजस्थानमधील राजकीय परिस्थितीला राहुल गांधी जबाबदार"