प्रियांका गांधी खरोखर निवडणूक लढवणार?; काँग्रेसमध्ये विचार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 06:44 AM2019-03-31T06:44:24+5:302019-03-31T06:44:47+5:30
शीलेश शर्मा नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेशातून लोकसभा निवडणुकीला उभे करण्याविषयी कॉग्रेस नेतृत्व गांभीर्याने ...
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेशातून लोकसभा निवडणुकीला उभे करण्याविषयी कॉग्रेस नेतृत्व गांभीर्याने विचार करीत आहे. मात्र प्रियांका गांधी यांनी त्याबाबत निर्णय न घेतल्याने उमेदवारीबाबत ठरलेले नाही.
प्रियांका यांनी याच आठवड्यात आपण निवडणूक लढवू शकतो, असे सांगितले होते. त्यानंतर वाराणसीतून निवडणूक लढवू का, असाही
प्रतिसवाल त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केला होता. त्यामुळे वाराणसीसह तीन मतदारसंघांसाठी त्यांच्या नावाचा विचार सुरू झाला. लखनौ व अलाहाबाद हे अन्य दोन मतदारसंघ आहेत. या तिन्ही ठिकाणचे उमेदवार काँग्रेसने जाहीर केलेले नाहीत. प्रियांका यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास अखेरच्या दिवशी त्या अर्ज भरून सर्वांनाच धक्का देतील. राहुल गांधी यांनीही अमेठीखेरीज अन्य मतदारसंघांतून निवडणूक लढवण्याची चर्चा आहे. तसे ठरल्यास प्रथम केरळ, तामिळनाडू व कर्नाटक या क्रमानेच राहुल गांधी मतदारसंघ ठरवतील. या तिन्ही राज्यांतून त्यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी होत आहे.