प्रियंका गांधी म्हणाल्या 'जय सियाराम'! राम मंदिराच्या भूमिपूजनाबाबत केले मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 03:12 PM2020-08-04T15:12:31+5:302020-08-04T15:18:09+5:30
एकीकडे काँग्रेसचे नेते मंदिराच्या भूमिपूजनावरून सत्ताधारी भाजपावर टीका करत आहेत. तर दुसरीकडे आज काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून राम मंदिराला समर्थन दिले आहे.
नवी दिल्ली - बुधवारी अयोध्येत होत असलेल्या राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशातील राजकारण तापलेले आहे. एकीकडे काँग्रेसचे नेते मंदिराच्या भूमिपूजनावरून सत्ताधारी भाजपावर टीका करत आहेत. तर दुसरीकडे आज काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून राम मंदिराला समर्थन दिले आहे. भगवान श्रीरामाचे चरित्र हे भारतीय भूमीला मानवतेशी जोडणारे असल्याचे त्यांनी या पत्रकात म्हटले आहे. तर या पत्रकाची अखेर प्रियंका गांधींनी 'जय सियाराम' अशी घोषणा देऊन केली आहे.
या पत्रकात प्रियंका गांधी म्हणतात की, अनेक युगांपासून भगवान श्रीरामाचे चरित्र भारतीय भूमीमध्ये मानवतेला जोडण्याचे काम करत आले आहे. भगवान राम आश्रय आहे आणि त्यागही. राम शबरीचाही आहे आणि सुग्रीवाचाही. राम वाल्मिकींचे आहेत आणि भासांचेसुद्धा आहेत. राम कबिरांचे आहेत आणि तुलसीदासांचेसुद्धा आहेत.
सरलता, साहस, संयम, त्याग, वचनवद्धता, दीनबंधु राम नाम का सार है। राम सबमें हैं, राम सबके साथ हैं।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) August 4, 2020
भगवान राम और माता सीता के संदेश और उनकी कृपा के साथ रामलला के मंदिर के भूमिपूजन का कार्यक्रम राष्ट्रीय एकता, बंधुत्व और सांस्कृतिक समागम का अवसर बने।
मेरा वक्तव्य pic.twitter.com/ZDT1U6gBnb
सरळमार्गीपणा, साहस, संयम, त्याग, वचनबद्धता, दीनबंधू हे रामनामाचे सार आहे. राम सर्वांचे आहेत. सर्वांसोबत आहेत. भगवान राम आणि माता सीतेचा संदेश आणि त्यांची कृपा आणि रामलल्लांच्या मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम राष्ट्रीय ऐक्य, बंधुत्व आणि सांस्कृतिक समरतेचा सोहळा बनू द्या, असे आवाहन प्रियंका गांधी यांनी ट्विटमधून केले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश
पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला
अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी
coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल