"एका निशस्त्र तरुणीला बंदुकीवाले घाबरले", दिशाच्या अटकेवर प्रियंका गांधी कडाडल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 11:58 AM2021-02-15T11:58:54+5:302021-02-15T12:11:34+5:30

Congress Priyanka Gandhi And Disha Ravi : काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

priyanka gandhi tweet on disha ravi arrest toolkit case climate change activist | "एका निशस्त्र तरुणीला बंदुकीवाले घाबरले", दिशाच्या अटकेवर प्रियंका गांधी कडाडल्या

"एका निशस्त्र तरुणीला बंदुकीवाले घाबरले", दिशाच्या अटकेवर प्रियंका गांधी कडाडल्या

Next

नवी दिल्ली - पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवी या तरुणीला अटक करण्यात आली आहे.  टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दिशाच्या अटकेनंतर आता राजकारण तापायला सुरुवात झाली असून काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी या प्रकरणावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम (P. Chidambaram) आणि शशी थरूर (Shashi Tharoor)यांनी देखील आता दिशाच्या अटकेचा विरोध केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. त्यानंतर आता काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

दिशा रवीच्या अटकेनंतर प्रियंका गांधी यांनी ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला आहे. "एका निशस्त्र तरुणीला बंदुकीवाले घाबरत आहेत" अशी घणाघाती टीका प्रियंका यांनी केली आहे. "डरते हैं बंदूकों वाले एक निहत्थी लड़की से, फैले हैं हिम्मत के उजाले एक निहत्थी लड़की से" अशा शब्दांत प्रियंका गांधी यांनी दिशा रवीच्या अटकेचा निषेध केला आहे. अटकेवरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच ReleaseDishaRavi, DishaRavi IndiaBeingSilenced हे हॅशटॅग देखील वापरले आहेत.

"कार्यकर्त्यांना जेल आणि दहशतवाद्यांना बेल", दिशाच्या अटकेवरून शशी थरूर यांचा मोदी सरकारवर घणाघात 

काँग्रेसचे नेते शशी थरूर (Shashi Tharoor)यांनी देखील आता दिशाच्या अटकेचा विरोध केला आहे. "कार्यकर्त्यांना जेल आणि दहशतवाद्यांना बेल" असं म्हणत मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. तसेच शशी थरूर यांनी जम्मू-काश्मीरचे निलंबित डीएसपी देविंदर सिंह यांचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. शशी थरूर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. देविंदर सिंह यांच्या फोटोसह दिशाला अटक झाल्याची बातमी सांगणारा एक स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. "कार्यकर्ते तुरुंगात बंद आहेत तर दहशतवादाचा आरोप असलेले जामिनावर बाहेर... आमचे अधिकारी पुलवामा हल्ल्याची आठवण कशी काढतील याचा विचार करताय?… खालच्या दोन शीर्षकांमध्ये उत्तर मिळेल" असं शशी थरूर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. पुलवामा हल्ल्यातील कटामध्ये देविंदर सिंह यांचं नाव आलं होतं, त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. आता ते जामिनावर बाहेर आहेत. 

"जर 22 वर्षांची विद्यार्थिनी देशासाठी धोका ठरत असेल तर भारताचा पाया नक्कीच डळमळीत झालाय" 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांनी दिशा रवीच्या (Disha Ravi) अटकेचा विरोध केला आहे. यावरून सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. "भारत मूर्खपणाची रंगभूमी बनत चालला आहे" अशा शब्दांत निशाणा साधला आहे. पी. चिदंबरम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. भारताचा पाया नक्कीच डळमळीत झाला असल्याची घणाघाती टीका देखील चिदंबरम यांनी केली आहे. "जर 22 वर्षांची विद्यार्थिनी देशासाठी धोका ठरत असेल तर भारताचा पाया नक्कीच डळमळीत झाला आहे. शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठीचं एक टूलकिट भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या चीनी सैनिकांपेक्षाही धोकादायक झालं आहे" असं पी चिदंबरम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.  तरुणांना हुकूमशाही सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन देखील त्यांनी केलं आहे.

 

Read in English

Web Title: priyanka gandhi tweet on disha ravi arrest toolkit case climate change activist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.