नवी दिल्ली - राज्यात कोरोना व्हायरसने जबरदस्त हाहाकार माजवला आहे. रोजच्या रोज नव्या कोरोना बाधितांचा आकडा आणि मृतांची संख्या वाढताना दिसत आहे. असे असताना, राज्यात मात्र रेमडिसेवीर औषधाच्या मुद्द्यावरून राजकारण सुरू आहे. आता या राजकारणात काँग्रेस पक्षाच्या सरचिटनिस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करत निशाणा साधला आहे. फडणवीस यांनी रेमडेसेवीरचा साठा करणे हे मानवतेविरुद्ध आहे, असे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे. (Priyanka Gandhi Tweeted the video and targets Devendra Fadnavis )
आता मुंबई उच्च न्यायालयानं घेतली रेमडेसिवीरच्या तुटवड्याची दखल; केंद्राला नोटीस, राज्यालाही फटकारलं
जेव्हा देशाच्या कानाकोपऱ्यातून रेमडेसिवीरची मागणी होत आहे. जीव वाचविण्यासाठी रेमडेसिवीर मिळावे, म्हणून लोक प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. अशा वेळी, एका महत्त्वाच्या पदावर राहिलेल्या भाजपच्या नेत्याने रेमडेसेवीरची साठेबाजी करणे, मानवतेविरुद्ध आहे, अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली आहे. आपल्या या ट्विट सोबत प्रियांका गांधी यांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पोलीस ठाण्यातील पोलिसांना धारेवर धरतानाच एक व्हिडिओ जोडला आहे.
देश सोडून चिनी कोरोना लस घेण्यासाठी नेपाळमध्ये का जातायत लोक? उत्तर वाचून व्हाल अवाक!
प्रियांकांना भाजपचं प्रत्युत्तर -प्रियांका यांच्या फडविसांवरील टीकेला आता भाजपनेही प्रत्युत्तर दिले आहे. प्रियांका गांधी यांनी अभ्यास करून बोललायला हवे. राज्यात काँग्रेस सत्तेत आहेत. महाराष्ट्रात ऑक्सिजन, व्हेंटीलेटर आणि बेडचा तुटवडा जाणवत आहे. लोक रस्त्यावर मरत आहेत. महाराष्ट्र सरकार कोरोना रोखण्यात अपयशी ठरत आहे. प्रियांका गांधी यांनी किमान महाराष्ट्र सरकारकडून तरी याचा हिशोब मागायला हवा, असे भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीसांना अटक करा - रेमडेसिवीर (Remdesivir) इंजेक्शनचा साठा असल्याच्या संशयावरून पोलिसांनी ब्रूक फार्माच्या मालकाला चौकशीसाठी बोलावले होते. परंतु त्याचवेळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सरकारी कामात अडथळा आणला, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे. त्यांनी ही मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे.
CoronaVirus: आता घरो-घरी जाऊन लसीकरण करण्याची तयारी, 45 वर्षांखालील लोकांनाही मिळू शकते कोरोना लस!
रुपाली चाकणकर यांच्या मागणीवर, भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले आहे, उठले की निघाले आरोप करायला, आता काय तर म्हणे देवेंद्र फडणवीसांना अटक करा. अटक मटक चवळी चटक वाटलं की काय? रेमडेसिवीर राज्य सरकारलाच देणार होते संबंधीत मंत्र्यांशी CSसाहेबांशी बोलणं झालेलं..माहिती तर घ्यायची आधी, सरकार म्हणतं सहकार्य करा आम्ही करत आहोत व करणारचं पण या बावळटांना आवरा रे. अशा प्रकारे वाघ यांनी अप्रत्यक्ष पणे रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे.