मोदींच्या बालेकिल्ल्यात प्रियंका गांधींचा नारा; बिनधास्त बोला, प्रश्न विचारा!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 04:59 PM2019-03-12T16:59:57+5:302019-03-12T17:01:55+5:30
काँग्रेसचे महासचिवपद स्वीकारून राजकारणात सक्रिय झाल्यानंतर प्रथमच कार्यकर्त्यांना संबोधित करणाऱ्या प्रियंका गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली.
अहमदाबाद - काँग्रेसचे महासचिवपद स्वीकारून राजकारणात सक्रिय झाल्यानंतर प्रथमच कार्यकर्त्यांना संबोधित करणाऱ्या प्रियंका गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली. नरेंद्र मोदी आणि भाजपाने भावनिक मुद्द्यांवर बोलण्यापेक्षा विकासावर चर्चा करावी. असा टोला प्रियंका गांधी यांनी लगावला. तसेच मतदारांनी बिनधास्त बोलून, सरकारला प्रश्न विचारावेत, असे आवाहनही केले.
गांधीनगर येथे काँग्रेसच्या कार्यकारिणीची आज बैठक झाली. त्यानंतर आयोजित जनसभेला संबोधित करताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठमोठी आश्वासने देतात. मात्र त्यांना दोन कोटी रोजगार कुठे गेला. महिला सुरक्षेचे काय झाले, याचा प्रश्न मोदींना विचारला पाहिजे.
प्रेम, समता, बंधुता यांच्या पायावर हा देश उभा आहे. मात्र आज या देशात जे काही घडत आहे ते अत्यंत वाईट आहे. तुमची जागरुकताच या देशाला घडवणार आहे. स्वातंत्र्याची लढाई याच ठिकाणाहून सुरू झाली होती. आता तिथूनच या सरकारविरोधात आवाज उठवण्यास सुरू झाली पाहिजे, असे आवाहनही प्रियंका गांधी यांनी यावेळी केले.
Priyanka Gandhi Vadra, Congress in Gandhinagar, Gujarat: This country is made on the foundations of love, harmony & brotherhood. Today whatever is happening in the country is very sad. pic.twitter.com/ylBwJro0h9
— ANI (@ANI) March 12, 2019
देशातील घटनात्मक संस्था उद्ध्वस्त झाल्या आहेत. मने दुभंगलेली आहेत. त्यामुळे देशाचे रक्षण करण्यासाठी एजुटीने काम करण्याची जबाबदारी तुमच्यावर आणि माझ्यावर आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
Priyanka Gandhi Vadra, Congress in Gandhinagar: Our institutions are being destroyed. Wherever you see, hatred is being spread. Nothing matters more to us that you and I protect this nation, work for it and move forward together. pic.twitter.com/CvOGdsWtAK
— ANI (@ANI) March 12, 2019
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 58 वर्षानंतर गुजरातमध्ये काँग्रेस कार्यकारणीची बैठक आज झाली. या बैठकीसाठी सोनिया गांधी, महासचिव प्रियंका गांधी तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी उपस्थित आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये होत असलेल्या काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
Priyanka Gandhi Vadra, Congress in Gandhinagar, Gujarat: You will have to think what exactly is this election. What are you going to choose in this election? You are going to choose your future. Useless issues should not be raised. pic.twitter.com/xnN1CHZh6U
— ANI (@ANI) March 12, 2019