मिर्झापूर: काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी आज उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमधील विंध्ववासिनी मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं. त्यांनी मंदिरात पूजादेखील केली. यावेळी काहींनी मोदी-मोदी अशी घोषणाबाजी केली. काही उत्साही लोकांनी 'हर-हर मोदी, घर-घर मोदी' अशा घोषणा दिल्या. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून प्रियंका गांधींनी दौऱ्यांचा सपाटा लावला आहे. त्यांच्याकडे पक्षानं उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी दिली आहे.प्रियंका गांधींच्या बोट यात्रेचा आज दुसरा दिवस आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांनी ख्वाजा इस्माइल चिश्ती दर्ग्याला भेट दिली. यानंतर त्या विंध्ववासिनी मंदिरात पोहोचल्या. या ठिकाणी त्यांनी विंध्ववासिनी देवीचं दर्शन घेतलं आणि पूजाही केली. यावेळी प्रियंका गांधींसमोर लोकांनी मोदी-मोदी अशी घोषणाबाजी केली. मंदिराबाहेर उभ्या असलेल्या काहींनी तर 'हर-हर मोदी, घर-घर मोदी' अशा घोषणादेखील दिल्या.
Video: देवीच्या दर्शनाला गेल्या प्रियंका गांधी; उपस्थितांची मोदींच्या नावानं घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 4:19 PM