प्रियंका गांधी लवकरच सरकारी बंगला सोडणार, 'या' ठिकाणी राहायला जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 02:05 PM2020-07-22T14:05:11+5:302020-07-22T14:07:59+5:30
प्रियंका गांधी यांना दिल्लीतील लोधी इस्टेटमधील सरकारी बंगला खाली करण्यास सांगितले आहे.
नवी दिल्ली - केंद्रातील मोदी सरकारने काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना दिल्लीतील लोधी इस्टेटमधील सरकारी बंगला खाली करण्यास सांगितले आहे. प्रियंका यांना 1 ऑगस्ट 2020 पर्यंत बंगला खाली करण्यासंबंधी नोटीस पाठविण्यात आली आहे. त्यानंतर आता प्रियंका गांधी लवकरच सरकारी बंगला सोडून खासगी निवासस्थानी जाणार आहेत. प्रियंका आपल्या कुटुंबीयांसहित गुरुग्राममधील सेक्टर 42 मध्ये असलेल्या डीएलएफ अरालिया येथील घरात राहायला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका गांधी गुरुग्राममधील घरामध्ये सध्या शिफ्ट होणार आहेत. मात्र नवी दिल्लीतील दोन तीन ठिकाणी भाड्याचं घर पाहण्यात आलं आहे. येत्या काही दिवसांमध्ये त्यापैकी एक घर निश्चित करण्यात येणार आहे. जी घरं पाहण्यात आली आहेत त्यापैकी सुजान सिंह पार्क जवळ असलेल्या एका घरात त्या राहायला जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या या ठिकाणी घराच्या दुरूस्तीचं काम सुरू आहे.
राजकारण तापलं! ...म्हणून राहुल गांधींनी केली सरकारवर जोरदार टीकाhttps://t.co/LiwIgPOgqK#RahulGandhi#Congress#VikramJoshi#BJP
— Lokmat (@MiLOKMAT) July 22, 2020
भाजपाच्या 'या' नेत्याला मिळणार प्रियंका गांधींचा बंगला; 'हे' आहे कारण
प्रियंका गांधी यांनी आपलं सामान गुरुग्राम येथील घरात हलवलं आहे. तसेच सुरक्षेबाबतही सर्व तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. प्रियंका गांधी यांना झे़ड + श्रेणीचं संरक्षण देण्यात आलं आहे. दरम्यान, आपल्या राजकीय बैठकींसाठी त्या सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाचा वापर करणार असल्याचं म्हटलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी सरकारी बंगल्यात आणखी काही दिवस राहू द्या अशी विनंती प्रियंका गांधी यांनी पंतप्रधानांना केल्याची माहिती समोर आली होती.
CoronaVirus News : उद्योगपतीने ऑफिसचं रुपांतर रुग्णालयात करण्यामागे 'हे' आहे कारणhttps://t.co/V7QH0O9ClM#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) July 22, 2020
बंगल्यात आणखी काही दिवस राहू द्या, प्रियंका गांधींनी केली मोदींना विनंती?, जाणून घ्या सत्य
पुढील काही दिवस आपल्याला बंगल्यात राहण्याची परवानगी देण्यात यावी अशी विनंती प्रियंका यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केल्याचं वृत्त काही ठिकाणी प्रसिद्ध झालं होतं. मात्र यावर स्वत: प्रियंका गांधी यांनी स्पष्टीकरण दिलं असून हे वृत्त फेटाळून लावलं होतं. अशी कोणतीही मागणी आपण केली नसल्याचंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून प्रियंका गांधी यांनी याबाबतचे ट्विट केलं होतं. "मी अशाप्रकारची कोणतीही विनंती सरकारकडे केली नाही. मला 1 जुलै रोजी बंगला रिकामा करण्याचं पत्र देण्यात आलं. त्यानुसार मी 1 ऑगस्ट रोजी 35 लोधी इस्टेटमधील माझा सरकारी बंगला रिकामा करणार आहे" असं ट्विट प्रियंका यांनी केलं होतं.
CoronaVirus News : परिस्थिती गंभीर! मास्क वापरणं अत्यंत गरजेचं नाहीतर...https://t.co/AYvJGow5Qk#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia#Mask
— Lokmat (@MiLOKMAT) July 22, 2020
महत्त्वाच्या बातम्या
"वचन होतं राम राज्याचं, दिलं गुंडाराज"; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल
कौतुकास्पद! कोरोनावर मात केल्यानंतर चक्क उद्योगपतीने ऑफिसला बनवलं रुग्णालय, मोफत देतोय उपचार
कोरोनाचा फटका! नोकऱ्यांबाबत अपडेट देणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड
CoronaVirus News : हवेतूनही होतो कोरोनाचा प्रसार; मास्कबाबत तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला, म्हणाले...
पावसाचे थैमान! आठ राज्यांत तब्बल 470 जणांचा मृत्यू