- हरीश गुप्तानवी दिल्ली : एसपीजी सुरक्षा कवच काढून घेतलेल्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या दिल्लीतील ३५, लोधी इस्टेट बंगल्यामध्ये सोमवारी दुपारी पाच अनोळखी माणसे अचानक कारमधून आली. या घुसखोरीमुळे प्रियांका यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी उघड झाल्या असून त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.प्रियांका गांधी यांच्या संरक्षणासाठी आता सीआरपीएफ व्हीआयपी सुरक्षा विभागाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. भेटीसाठी रितसर परवानगी न घेतलेल्यांना त्यांच्या कारसह प्रियांका गांधी यांच्या बंगल्याच्या आत कसे काय सोडण्यात आले, असा सवाल विचारण्यात येत आहे.प्रियांका यांना भेटण्यासाठी त्यांच्या बंगल्यामध्ये सोमवारी पाच अनोळखी माणसे आपल्या कारमधून आली. त्यामध्ये एका युवतीचाही समावेश होता. प्रियांकांना भेटून त्यांच्या समवेत बंगल्याच्या उद्यानात छायाचित्रे काढून घेण्याची इच्छा या पाच जणांनी व्यक्त केली.उत्तर प्रदेशहून दिल्लीला तुम्हाला भेटायला आलो असे त्यांनी प्रियांका गांधी यांना सांगितले. या अनोळखी लोकांनी बंगल्यामध्ये अचानक प्रवेश केल्यामुळे आश्चर्यचकित झालेल्या प्रियांका गांधी यांनी त्यांची विनंती अव्हेरली नाही.छायाचित्रे काढून झाल्यावर ते लोक निघून गेले. ही घटना घडली त्यावेळी प्रियांका गांधी बंगल्यात आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत होत्या. या अनोळखी लोकांना सीआरपीएफ जवानांनी बंगल्याच्या आत येऊच कसे दिले, असा जाब प्रियांका गांधी यांनी सीआरपीएफ अधिकाऱ्यांना विचारला. प्रियांका यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील मोठी त्रुटी उघड झाल्याने सीआरपीएफच्या पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाच्या एका अधिकाºयाने तातडीने त्यांच्या बंगल्याकडे धाव घेतली.एसपीजी सुरक्षा काढताच घडला प्रकारआतापर्यंत सोनिया गांधी, राहुल गांधी व प्रियांका गांधी यांना एसपीजीची सुरक्षा व्यवस्था होती. केंद्र सरकारकडून ती काढून घेण्यात आल्यानंतर हा प्रकार घडला आहे.प्रियांका गांधी यांच्या बंगल्यात घुसखोरी केलेल्या गाडीचा क्रमांक तसेच त्यातील पाच जणांचे चेहरेमोहरे सीसीटीव्ही कॅमेºयाने टिपले आहेत. त्यावरून या लोकांचा शोध घेतला जात आहे.सुरक्षा व्यवस्थेत ढिसाळपणा दाखविणाºया सीआरपीएफ जवानांवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.गाडी घुसखोरीच्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू झाली आहे. राहुल गांधींची गाडी असल्याचे वाटल्याने तिला न अडविता सीआरपीएफ जवानांनी बंगल्यात प्रवेश दिला.
प्रियांका गांधी यांच्या बंगल्यात पाच जणांची कारसह घुसखोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 5:03 AM