सचिन पायलट यांना रात्री उशिरा थेट प्रियांका गांधींचा फोन; राजस्थानात राजकीय हालचालींना वेग 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 10:24 AM2021-06-11T10:24:44+5:302021-06-11T10:29:41+5:30

देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेस सध्या अनेक संकटांचा सामना करत आहे. जितिन प्रसाद यांनी काँग्रेस सोडली. नवोजत सिंग सिद्धू नाराज आहेत. सचिन पायलट मौन आहेत. त्यांच्या मौन असण्यामागचे कारणदेखील त्यांची नाराजी आहे आणि नाराजी मागे ती आश्वासनं आहेत जी अद्यापही पूर्ण झालेली नाहीत...

Priyanka Gandhi's phone call to Sachin Pilot late last night; Accelerate political movements in Rajasthan | सचिन पायलट यांना रात्री उशिरा थेट प्रियांका गांधींचा फोन; राजस्थानात राजकीय हालचालींना वेग 

सचिन पायलट यांना रात्री उशिरा थेट प्रियांका गांधींचा फोन; राजस्थानात राजकीय हालचालींना वेग 

Next
ठळक मुद्देदेशातील सर्वात जुना पक्ष असलेला काँग्रेस सध्या अनेक संकटांचा सामना करत आहे. जितिन प्रसाद यांनी काँग्रेस सोडली. नवोजत सिंग सिद्धू आणि सचिन पायलट नाराज आहेत.पायलटांच्या नाराजीमागे ती आश्वासनं आहेत जी अद्यापही पूर्ण झालेली नाहीत.

नवी दिल्ली - राजस्थानात राजकीय हालचालींना वेग आला आहे. येथे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट नाराज आहेत. काँग्रेस हायकमानकडून सचिन पायलट यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधींसह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी रात्री उशिरा सचिन पायलट यांना फोन करून त्यांच्याशी चर्चा केली. (Priyanka Gandhi's phone call to Sachin Pilot late last night; Accelerate political movements in Rajasthan)

यातच, आज सचिन पायलट सकाळी अचानकपणे दौसा येथे पोहोचले. त्यांनी येथे वडल राजेश पायलट यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्यासोबत जवळपास अर्धा डझन आमदारही आहेत. तसेच, सचिन पायलट गटातील राजीनामा दिलेले आमदार हेमाराम चौधरी रात्री उशिरा जयपूरलापोहोचले आहेत. ते आज विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी यांची भेट घेणार आहेत. यापूर्वीच, विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी यांनी, व्यक्तिशः  भेटल्यानंतरच राजीनाम्याचा निर्णय घेतला जाईल, असे म्हटले होते.

सचिन हे 'काँग्रेसचेच पायलट', भाजपातील प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम

काय आहे संपूर्ण प्रकरण -
देशातील सर्वात जुना पक्ष असलेला काँग्रेस सध्या अनेक संकटांचा सामना करत आहे. जितिन प्रसाद यांनी काँग्रेस सोडली. नवोजत सिंग सिद्धू आणि सचिन पायलट नाराज आहेत. काँग्रेसमध्ये चिंतन आणि मंथम सुरू आहे. सध्या, सचिन पायलट मौन आहेत. मात्र, त्यांच्या मौन असण्यामागचे कारण त्यांची नाराजी आहे आणि नाराजीमागे ती आश्वासनं आहेत जी अद्यापही पूर्ण झालेली नाहीत.

पंजाबमधील वाद 10 दिवसांत मार्गी लागतो. मज राजस्थानमध्ये 10 महिने होऊनही मार्ग का सापडत नाही? असा सवाल पायलट समर्थक आमदार करत आहेत. काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस भंवर जितेंद्र सिंह यांनीही म्हटले आहे, की पायलट यांना देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता व्हायला हवी. यासंदर्भात एकीकडे काँग्रेसमध्ये मंथन सुरू आहे. तर दुसरीकडे पायलट यांच्या घरी काल बैठ झाली.

आता राजस्थानमध्ये राजकीय घडामोडींना वेग, सचिन पायलट यांना भेटण्यासाठी पोहोचले आठ आमदार 

गेल्या वर्षी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासोबत सचिन पायलट यांचे मतभेद झाले होते. मात्र, काँग्रेस श्रेष्ठींच्या हस्तक्षेपानंतर पायलट यांनी माघार घेतली होती. यावेळी सरकारमध्ये सचिन पायलट यांची भागीदारी वाढविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पायलट गटातील आमदारांना मंत्री अथवा राज्यातील कुण्या बोर्डाचे सदस्यत्व अथवा चेअरमन करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यावेळी, पक्षातील कलह संपवण्यासाठी, अशा प्रकारे मार्ग काढण्यात आला असला तरी वाद अद्यापही संपलेला नाही.

Web Title: Priyanka Gandhi's phone call to Sachin Pilot late last night; Accelerate political movements in Rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.