नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्यांमध्ये काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या अलाहाबाद दौ-यात माणुसकीचे दर्शन घडले. ट्यूमर झालेल्या मुलीची गंभीर प्रकृती पाहून तिला दिल्लीला नेण्याचा आणि तेथील एम्स रुग्णालयात उपचार करण्याचा निर्णय प्रियांका गांधी यांनी शुक्रवारी घेतला. त्या मुलीला दिल्लीला नेण्यासाठी त्यांनी एका खासगी विमानाचीही व्यवस्था केली.उपचारानंतरही तिच्या प्रकृतीत काहीच सुधारणा होत नव्हती. घरची आर्थिक स्थिती बिकट असल्याने कुटुंबीयांनी प्रियांका यांच्याकडे मदत मागितली. त्यानंतर प्रियांका यांनी तातडीने मदतीची पावले उचलली. त्या काँग्रेसचे उमेदवार योगेश शुक्ला यांच्या प्रचारासाठी आल्या असतानाची ही घटना आहे.प्रियांका यांनी लगेचच राजीव शुक्ला, माजी खासदार व क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दिन व हार्दिक पटेल यांच्याशी चर्चा करून मुलीला दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. एका खासगी विमानाची व्यवस्था करण्यात आली. त्यातून ती मुलगी, तिची आई तसेच मोहम्मद अझहरुद्दिन आणि हार्दिक पटेल दिल्लीला रवाना झाले.
आजारी मुलीसाठी प्रियांकांनी केली विमानाची व्यवस्था; लोकांनी केले कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 5:37 AM