- शीलेश शर्मा नवी दिल्ली : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पावलांवर पाऊल टाकत कॉँग्रेस महासचिव प्रियांका गांधी पक्षाला संजीवनी देण्याचा प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे हताश झालेल्या पक्षामध्ये चैतन्य निर्माण केले. दहा आदिवासींच्या खुनाच्या घटनेमुळे सोनभद्र येथे पीडितांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी प्रियांका जात होत्या. मुख्यमंत्री योगी सरकारच्या सुचनेवरुन प्रशासनाने त्यांना नारायणपूर पोलीस ठाण्याच रोखले. त्यावेळी प्रियांका यांनी तेथेच रस्त्यावर धरणे धरले. नंतर त्यांना चुनार गेस्ट हाऊस येथे नेऊन नजरकैदेत ठेवण्यात आले. सोनभद्र येथे जाण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली. या घटनेनंतर संपूर्ण कॉँग्रेस सक्रीय झाली. पक्षाचे महासचिव के.सी.वेणुगोपाल यांनी देशभरातील पक्ष संघटनेला या विरोधात देशव्यापी धरणे देण्याच्या सूचना दिल्या.राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही टिष्ट्वट करुन उत्तर प्रदेश सरकारची कारवाई चुकीची आहे, असे म्हटले आहे. प्रियांका यांना रोखण्याचे हे पाऊल अन्यायपूर्ण आणि लोकशाही विरोधी आहे. पीडितांच्या कुटुंबियांना भेटण्याचा आणित्यांच्या मागे उभे राहण्याचाविरोधी पक्ष नेत्यांना अधिकार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.योगी यांच्या आशिर्वादाने राज्यात संघटीत गुन्हेगारी वाढली आहे, असे पक्ष प्रवक्ता सूरजेवाला यांनी म्हटले असून महिला बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत दिलेल्या एका उत्तराचा उल्लेख करत बलात्काराच्या घटनांपैकी ६९८७बलात्कार केवळ उत्तर प्रदेशात झाले आहेत, असे निदर्शनास आणले आहे.प्रियांका यांनी सोनभद्रयेथे जाण्याचा निर्णय अचानक घेतला. त्याची माहिती अन्य नेत्यांना नव्हती. कॉँग्रेस नव्या अध्यक्षाच्या प्रतिक्षेत असताना प्रियांका गांधीयांनी निवडणूक निकालानंतर पूर्वांचलचा पहिला दौरा केला. आपल्या आजीच्या पाऊलखुणांवर चालत मृत कॉँग्रेसला संजीवनी देण्याचे काम केले.>प्रियांका गांधींकडे उत्तर प्रदेश काँग्रेसची सूत्रेउत्तर प्रदेश पश्चिम विभागाचे प्रभारी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राजीनामा दिल्याने संपूर्ण उत्तर प्रदेशची जबाबदारी प्रियांका गांधी यांना सांभाळण्यास सांगण्यात आले आहे.अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या वतीने यासंदर्भात औपचारिक आदेश जारी करण्यात आलेला नाही. परंतु, बुधवारी अमेरिका भेटीवर रवाना होण्याआधी राहुल गांधी यांनी प्रियांका यांना पुढील व्यवस्था होईपर्यंत संपूर्ण उत्तर प्रदेशची जबाबदारी घेण्यास सांगितले.अलीकडेच राहुल यांनी महाराष्टÑ आणि छत्तीसगड अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिली आहे. राहुल २२-२३ जुलै रोजी परतणार असून, त्यानंतरच काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होईल, असे समजते.
इंदिरा गांधींच्या पावलांवर प्रियांका यांचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 4:18 AM